

मराठी सिनेसृष्टीत सासू सुनेच्या जोडींपैकी लोकप्रिय जोडी म्हणजे शिवानी रांगोळे आणि मृणाल कुलकर्णी. शिवानी आणि मृणालने तिच्या लग्नापूर्वीही अनेक प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. आता शिवानी त्यांची सून बनल्यापासून हा बॉन्ड अधिकच घट्ट झाला आहे. या दोघींचे ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन बॉंडिंगचे चाहतेही बरेच आहेत. शिवानीचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवासानिमित्त मृणाल यांनी खास पोस्ट शेयर केली आहे. (Latest Entertainment News)
यामध्ये त्या म्हणतात, “प्रिय शिवानी…एखादी वाऱ्याची झुळूक यावी तशी तू आमच्या आयुष्यात आलीस… तुझं खळाळून हसणं, जरा वेळ मिळाला की “घर-घर” खेळणं, घरातल्या सगळ्यांची काळजी घेणं, तुझी गोड चिवचिव आणि मुख्य म्हणजे मी जास्त उद्योग केले की मलादेखील दटावणं… हे सगळंआम्हाला फार फार आवडतं…’तुला शिकवीन चांगलाच धडा’नंतर मिळालेला हा ब्रेक तू छान एन्जॉय केलास.
तू आपल्या कुटुंबाशी एकरूप झाली आहेस हे पाहून खूप बरं वाटतं… “कोहम” या गोनिदांच्या कादंबऱ्यांवर आधारित नाट्यमय अभिवाचनासाठी तुझं भरपूर कौतुक होत आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आता तुझं नवं नाटक येणार. “शंकर _जयकिशन” भरत जाधव आणि या महेश मांजरेकर दिग्गज कलावंतांबरोबर तू तशीच ताकतीने उभी राहशील यात आम्हाला बिलकुल शंका नाही. भरपूर कष्ट कर, मोठी हो!
पण तुझ्या चेहऱ्यावरचं गोड हसू असंच राहुदेत… आम्हाला आमच्या सुनेकडून मिळतंय तसंच सुख तुझ्या आईबाबांना त्यांच्या जावयाकडून देखील मिळेल याची खात्री आहे मला!! तुम्हा दोघांनाही खूप खूप प्रेम…”
मृणाल यांच्या पोस्टवर चाहते शिवानीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.