

pakistani actress shameen khan controversial statement: पाकिस्तानच्या अभिनेत्री या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतात. अशीच एक पाकिस्तानची अभिनेत्री शमीन खान हिचे एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या अभिनेत्रीने जर पुरूष आपल्या पत्नीची परवानगी घेऊन दुसरं लग्न करू शकतो. तिच्या मते दुसरे लग्न करणं काही वाईट नाहीये. यासाठी शमीनने एक वेगळाच तर्क लढवला आहे. तिच्या या वक्तव्यावर जनता मात्र जाम भडकली आहे.
एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्री शमीनला दुसऱ्या लग्नाबाबत तिचे मत विचारण्यात आले होते. त्यावेळी अभिनेत्रीने दिलेले उत्तर सर्वांनाच धक्का देऊन गेले. शमीन म्हणाली की, पहिल्या बायकोला सोडू नये. ती पत्नी पुरूषांच्या वंशाला पुढे नेत असते. त्यामुळं पहिल्या पत्नीला सोडणं चुकीचं आहे.'
यावर पॉडकास्टच्या होस्टने विचारलं की पहिली पत्नी असल्यावर पुरूष दुसरं लग्न करू शकतो का यावर शमीन म्हणाली की, जर त्या पत्नीचे वय ४० पेक्षा जास्त झाले असले आणि पतीला आता नातं पुढं न्यावं की नाही हे समजत नसेल तर आणि तो आपल्या पत्नीसोबत खुश नसेल. त्याला वाटत असेल की त्याला आता दुसरं लग्न केलं पाहिजे तर त्यात काही वाईट नाहीये. पुरूष आपल्या पत्नीची परवानगी घेऊन दुसरं लग्न करू शकतो. मात्र लग्नानंतर एक्स्ट्रा मॅरेटल अफेयर्सच्या मी विरोधात आहे. '
शमीन खानची ही पॉडकास्टमधील क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी तिला चांगलेच धारेवर धरत आहेत. काही युजर्सनी लग्न काही गंमतीची गोष्ट नाही. एक जबाबदारी आहे. दुसऱ्या एकाने जर पत्नीला पती आवडला नाही तर तिनं काय करावं? एका युजरने तर शमीनला या वक्तव्यासाठी जेलमध्ये टाकले पाहिजे अशी मागणी केली.
शमीन खान ही ३० वर्षाची पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री आहे. तिने काही चित्रपटात देखील काम केले असून २०१९ मध्ये गुम या चित्रपटाद्वारे तिने आपला फिल्मी प्रवास सुरू केला. त्याचबरोबर ती टीव्ही शो गोहर -ए- नायाब, हिना की खुशबू, धडकन, भरोसा प्यार तेरा आणि खुदा और मोहब्बत ३ या सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.