Zareen Khan mother dies | 'वीर' फेम अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; जरीन खानच्या आईचे निधन, प्रदीर्घ आजाराशी झुंज अपयशी

Zareen Khan mother dies | वीर फेम अभिनेत्री जरीन खानला मातृशोक, दीर्घकाळ आजारी होती आई
zareen khan with mother
Zareen Khan mother diespudhari photo
Published on
Updated on
Summary

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानची आई परवीन खान यांचे ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी मुंबईत निधन झाले. त्या गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त होत्या आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. जरीनने अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. अंधेरी येथील वर्सोवा कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, या घटनेने जरीन आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Zareen Khan's mother Pareev Khan passes away

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खानच्या (Zareen Khan) चाहत्यांसाठी एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. जरीनची आई, परवीन खान यांचे आज ८ एप्रिलला सकाळी मुंबईत निधन झाले. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. ऑक्टोबर २०२५ पासून त्यांना दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्रदीर्घ आजार आणि जरीनची धडपड

मिळालेल्या माहितीनुसार, परवीन खान यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून खालावली होती. त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत होते. जरीन खान ही आपल्या आईच्या खूप जवळ होती. आईच्या उपचारादरम्यान तिने अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना त्यांच्यासाठी दुआ करण्याची विनंती केली होती. जरीन स्वतः आईची काळजी घेण्यासाठी तिच्या कामातूनही ब्रेक घेत होती.

zareen khan with mother
Tumbbad 2 Villain | तुंबाड २ मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्नाची एन्ट्री? हस्तरच्या गुपिताचा उलगडा करण्यासाठी येणार मोठे स्टार्स?

जरीनने अनेकदा आफल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर आई सोबतचे फोटो शेअर केले आहेत. कधी ईद कधी वाढदिवसाचे सेलिब्रेशन त्या फोटोंमध्ये जरीन आणि आईचे फोटो होते. जरीन खानने नेहमीच आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला दिले होते

चित्रपटसृष्टीत शोककळा

सलमान खानसोबत 'वीर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जरीन खानने अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण केली होती. जरीन ३८ वर्षांची असून सिंगल आहे. ती आईसोबतच राहत होती. आईच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आणि तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

अंत्यसंस्कार

परवीन खान यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजताच्या सुमारास मुंबईतील अंधेरी येथील वर्सोवा मुस्लिम कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

zareen khan with mother
Chand Mera Dil teaser |कसा आहे 'चांद मेरा दिल'चा टीझर? लक्ष्य लालवानीच्या रोमँटिक लूकने मोडले 'Kill'चे रेकॉर्ड; नेटकरी म्हणाले, 'सैयारा'ची आठवण आली!

जरीन खानचे प्रोजेक्ट

जरीन खानने शॉर्ट ड्रामा 'फिर से रीस्टार्ट'मधून आपले करिअर सुरू केले होतं. २०१० मध्ये तिने सलमान खानचा चित्रपट 'वीर'मधून बॉलीवूड डेब्यू केला. जरीन खानने बी-ग्रेड चित्रपटातही काम केलं. ती 'डाका' आणि 'जट्ट जेम्स बॉन्ड' सारख्या पंजाबी चित्रपटांमध्येही दिसली. २०२१ मध्ये 'हम भी अकेले तुम भी अकेले'मध्ये अभिनय केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news