pahalgam atteck and fawad khan : काल पहलगाम येथे झालेल्या आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्याने सगळ्या देशाला धक्का बसला आहे. निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याने क्रौर्याचा भेसूर चेहरा समोर आला आहे. याचा परिणाम अभिनेता फवाद खानच्या आगामी ' अबीर गुलाल'वर होताना दिसतो आहे. सोशल मिडियावर या सिनेमाच्या रिलीजला कडाडून विरोध होतो आहे. या सिनेमात फवादसोबत अभिनेत्री वाणी कपूर आहे.
आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जखमी झाले आहे. नेटीझन्स विचारतात अजूनही आपण पाकिस्तानी कलाकारांसोबत सिनेमे बनवणार आहे का?
2016 मध्ये उरी या ठिकाणी झालेल्या हल्ल्यादरम्यान फवाद खानचा ' अ दिल है मुश्किल' सिनेमा रिलीज झाला होता. यावरही फवाद खान होता. उरी नंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय सिनेमांमध्ये काम करण्यावर बंदी आली होती. ही बंदी 2022 मध्ये हटवली होती.
रोमॅंटिक कॉमेडी या प्रकारात मोडणार हा सिनेमा अबीर गुलाल 9 मे मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या सुरुवातीपासूनच वादाचे ग्रहण आहे. आता तर x या प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी होते आहे. याशिवाय फवादच्या या सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विरोध केला होता.
पहलगामच्या हल्ल्यानंतर बॉलीवूड कलाकारांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. अभिनेता शाहरुख खान याबाबत म्हणतो, पहलगाममध्ये झालेली घटना एक अमानवीय कृत्य ज्याचा उल्लेख विश्वासघात म्हणून करता येईल.
विजय देवरकोंडा म्हणतो, हा हल्ला अस्वस्थ करणारा आहे. तसेच हल्लेखोर नक्कीच भ्यास मनोवृत्तीचे असावेत. याशिवाय पुष्पा फेम पहलगाम हल्ल्याने मी व्यथित झालो आहे. पीडितांच्या कुटुंबासोंबत माझ्या संवेदना आहेत.