

Operation Sindoor Mandana Karimi go back her country netizens demand
मुंबई : इराणी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम मंदाना करीमी एका पोस्टमुळे ट्रोल झालीय. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर तिने केलेल्या पोस्टवर नेटिझन्स टीका करताना दिसताहेत. लोक तिला भारत सोडून मायदेशी इराण वापस जाण्यास सांगत आहेत. मंदाना करीमीला सोशल मीडियावर धमक्या मिळत आहेत. यावर आता तिने मौन सोडले असून इन्स्टा स्टोरीवर पोस्टचे स्पष्टीकरण दिले आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये इन्स्टाग्रामवर लोक तिला कशाप्रकारे संदेश पाठवत आहेत, हे दाखवण्यात आलं आहे. अखेरीस मंदाना करीमीने पोस्ट शेअर करून संताप व्यक्त केला आहे.
तिने पोस्टमध्ये म्हटलंय- शांती विषयी एक सिंपल मेसेज - धर्म नव्हे, राजकारण नव्हे - द्वेषाचा पूर आणला. फेसलेस अकाऊंट्स आणि खोट्या नावाने मला माझ्या देशात परत जाण्यास सांगितले जात आहे. माझ्या बोलण्याच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मी तीव्रपणे स्पष्ट करू इच्छिते की, मी १६ वर्षांपासून भारतात राहत आहे.’
मंदाना करीमीने पुढे लिहिलंय, ‘मी कष्ट घेतले. अडॅप्ट केलं, सहयोग दिलं आणि प्रेम, एफर्ट्स, आदराने या ठिकाणाला माझं घर बनवलं. आणि हो इथे माझे सर्वात चांगले मित्र आहेत. त्यांनी मला जाणवून दिलं की, मी त्यांची जवळची आहे. मग दुसरी बाजू येते- छोट्या विचारवाले, टॉक्सिक कोपरा.. जे मला नेहमी एक आऊटसायडर प्रमाणे पाहतात, मग मी ते काहीही करू दे. गोष्ट ही आहे की : मी नेहमी ओपन, वोकल आणि जागरूक होते. ...मला सांगायची गरज नाही की, मी कधी बोलायचं, कधी नाही...काय बोलायचं...तो माझा अधिकार आहे....’
मंदाना करिमी म्हणाली होती की, तिला भारताचा अभिमान आहे. हा देश किती पुढे आला आहे याचा तिला अभिमान आहे. तिला भारत सरकारबद्दल खूप आदर आहे - जे आपल्या सीमांचे रक्षण करत आहे, आपली अर्थव्यवस्था वाढवत आहे आणि जागतिक स्तरावर मजबूत उभे आहे. मंदाना म्हणते की, या देशाने तिची जागा, उद्देश आणि अभिमान दिला आहे आणि या भावनेसोबत उभे राहण्याऐवजी, काही लोक फक्त ते तोडू इच्छितात, त्याचा द्वेष करू इच्छितात... मंदाना करीमीची ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की तिला ती तिच्या अकाउंटवरून तत्काळ डिलीट करावी लागली.