

Bhool Chuk Maaf Update News after India-Pakistan Tension
मुंबई - राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा भूल चूक माफ हा चित्रपट ९ मे रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या चित्रपटाची एडवांस बुकिंग देखील सुरू करण्यात आली होती. पण आता चित्रपटाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी भूल चूक माफ हा चित्रपट थिएटरमध्ये नाहीतर ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
निर्माते म्हणाले,"अलीकडील घडामोडी आणि देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता, मॅडॉक फिल्म्स आणि अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज यांनी आपल्या कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट 'भूल चूक माफ' हा १६ मे रोजी प्राइम व्हिडिओवर जगभरातील प्रेक्षकांसाठी थेट आपल्या घरी आणण्याचा निर्णय घेतला आहे. जरी आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांसोबत चित्रपटगृहात पाहण्यास उत्सुक होतो, तरीही राष्ट्राची भावना सर्वप्रथम येते. जय हिंद.''
'केसरी वीर' चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आधी हा चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण निर्मात्यांनी स्वतः सोशल मीडियावरून सांगितले की, हा चित्रपट आता २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
‘केसरी वीर’च्या टीजर-ट्रेलरी सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. या चित्रटात सूरज पंचोली, सुनील शेट्टीचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. शानदार ॲक्शन्स सीन्स देखील मोठ्या संख्येत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसणार आहे.