‘दिल मलंगी’मध्ये चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा, मीरा जोशीची मुख्य भूमिका

दिल मलंगी
दिल मलंगी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'दिल मलंगी' या अक्शन फँटसी चित्रपटाचे मुंबईतील एका आलिशान लोकेशनवर चित्रीकरण सुरु झाले. या चित्रपटाद्वारे अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी हे आघाडीचे कलावंत पाहिल्याचं एकत्र स्क्रिन शेअर करीत आहेत. या चित्रपटात चौघांच्याही भूमिका एकदम हटके आहेत, असे दिग्दर्शक सुनिल परब यांचे म्हणणे आहे.

'दिल मलंगी'च्या निर्मितीसाठी रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले, प्रमोद मुरकुटे हे निर्माते एकत्र आले. सून माझी भाग्याची', 'छावणी', 'चंद्री', 'पहिली भेट' या चित्रपटांसह अनेक दर्जेदार नाटकांचे दिग्दर्शन करणाऱ्या सुनिल परब यांच्या दिग्दर्शनातून हा चित्रपट येतोय.

चित्रपटाची कथा सतेज ढाणे पाटील या तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. महाविद्यालयीन जीवनातच त्याचं खुल्लम खुल्ला प्रेम होतं…पण ज्या मुलीवर मनापासून प्रेम केलं ती निव्वळ आपला टाईमपास करतेय हे लक्षात आल्यावर 'प्रेम' ह्या संकल्पनेवरचा त्याचा विश्वास उडतो. साहजिकच करिअरवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने तो मुंबई गाठतो. बुद्धिबळावर तो 'ग्लोबल ट्रान्स मिडिया' या जाहिरात एजन्सीचे सर्वेसर्वा हर्षवर्धन मराठे यांचे मन जिंकण्यात यशस्वी होतो. मात्र 'मुंबई नगरी'तल्या दैंनदिन प्रवासाला कंटाळून या शहराचा निरोप घेण्याचे ठरवितो. ही गोष्ट हर्षवर्धन यांना खटकते, ते सतेजला आणखी एक संधी देतात. ऑफिसच्या आलिशान रेस्ट हाऊसमध्ये सतेजचा मुक्काम सुरु होतो आणि त्याच्या आयुष्याचे चक्र फिरू लागते.

'सद्गुरू एंटरटेनमेंट, दीपलक्ष्मी निर्मित' 'दिल मलंगी'ची पुढील कथा पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. कथाकार स्वप्निल गांगूर्डे यांनी 'हास्यजत्रा फेम' अभिनेता प्रथमेश शिवलकर याच्यासोबत पटकथा लेखन केले आहे. संवाद प्रथमेश यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत चिन्मय उद्गीरकर, आस्ताद काळे, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव सत्यविजय धुरी यांसह प्रमुख सहाय्यक भूमिकेत नारायण जाधव, विनम्र भाबल, प्रभाकर मोरे, श्रीरंग देशमुख, आमिर तडवळकर, लीना पंडित, चित्रलेखा उपासनी, रुक्मिणी सुतार, मयूर धुरी, श्रुती हळदणकर, स्वाती कर्णेकर, प्रशांत देशमुख, मानसी बापट इत्यादी कलावंत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news