

टीव्ही अभिनेता Neil Bhatt आणि अभिनेत्री Aishwarya Sharma यांनी २०२१ मध्ये लग्न केलं होतं. अचानक त्यांच्या लग्नाशिवाय चार वर्षांनी , त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दिल्याची मीडिया रिपोर्ट्स समोर आल्या आहेत. दोघे काही काळापासून वेगळे राहतोय, सोशल मीडियावर एकत्र दिसत नाहीत आणि मेरिड लाइफमध्ये कलह असल्याचे संकेत आहेत.
Neil Bhatt-Aishwarya Divorce latest update
मुंबई - लोकप्रिय टीव्ही कपल ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांच्या नात्यात दुरावा आल्याचे वृत्त समोर आले आहे. लग्नाच्या ४ वर्षानंतंर त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचे म्हटले जात आहे. घटस्फोटाची प्रक्रिया लवकरच सुरु होईल. या कपलने अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. पण जवळच्या सूत्रांकडून ही माहिती मिळालीय.
नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा यांच्या नात्यात काही काळापासून तणाव आहे. त्यांच्यातील मतभेदाच वृत्त समोर येत आहेत. हा दावा केला जात होता की, ऐश्वर्या आणि नील आता वेगवेगळे राहणार आहेत. दरम्यान, असे वृत्त आले की, नील आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा अर्ज दिला आहे. आता कपलकडून कोणतेही अधिकृतपणे वक्तव्य आलेले नाही. आता वृत्त आहे की, घटस्फोटाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि ऐश्वर्या-नील वेगळे होतील.
रिपोर्टनुसार, ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट यांच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, मागील कही दिवसांपासून दोघे वेगळे राहत आहेत. आणि अधिकृतपणे घटस्फोटसाठी अर्ज दिला आहे. पण अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की, नील - ऐश्वर्या यांच्यात नेमकं काय बिनसलं?
ऐश्वर्या आणि नीलच्या घटस्फोटाच्या चर्चा तेव्हा सुरु झाल्या, जेव्हा दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो वा व्हिडिओ शेअर करणे बंद केले. गणपती पूजा आणि करवा चौथ ला देखील ऐश्वर्याने केवळ आपला फोटो शेअर केले होते. तर नीलने कोणतीही पोस्ट केली नाही. याशिवाय, ऐश्वर्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नेहमी विचित्र आणि क्रिप्टिक पोस्ट करत होती. त्यामुळे संशय आणखी बळावला. ऐश्वर्या - नीलने होळी आणि दिवाळीला देखील कोणताही फोटो शेअर केला नाही.
अशी आहे ऐश्वर्या शर्मा-नील भट्टची लव्ह स्टोरी
ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्टने २०२१ मध्ये लग्न केले होते. दोघांची पहिली भेट टीव्ही शो 'गुम है किसी के प्यार में' दरम्यान झाली होती. त्यावेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. एक वर्षाच्या आत त्यांनी लग्न केले होते. पण, चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट अर्ज केल्याचे वृत्त समोर आले आहे. लग्नानंतर ऐश्वर्या आणि नील एकत्र 'स्मार्ट जोडी' आणि 'बिग बॉस'मध्ये देखील दिसले होते. सेटवर काम करताना दोघांमध्ये पहिल्यांदा मैत्री झाली. नंतर ती प्रेमात बदलली.
नील भट्ट मिस्ट्री वुमनसोबत स्पॉट?
नुकताच नील भट्टला मुंबईमध्ये एका मिस्ट्री वुमनसोबत पाहण्यात आलं होतं. पापराझींनी दोघांना कॅमेराबद्ध केले होते. नील-ऐश्वर्या कोणत्याच पब्लिक इव्हेंटमध्ये एकत्र दिसले नाही. ते दोघे रील्स बनवायचे आणि डान्स करत होते. आता ऐश्वर्या सोशल मीडियावर आपले सोलो फोटो - व्हिडिओ अपलोड करते. नीलने अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट १६ सप्टेंबर, २०२५ रोजी एक ब्रँड कोलॅबोरेशनसाठी शेअर केला होता.