

Katrina Kaif-Vicky Kaushal welcome baby boy
मुंबई - ब्लेस्ड अशी कॅप्शन लिहित अभिनेता विकी कौशलने फॅन्ससाठी आनंदाची गोष्ट शेअऱ केलीय. इन्स्टाग्रामवर त्याने आपण बाबा झाल्याचे वृत्त शेअर केले आहे. कॅटरीनाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तशी कॅप्शन विकीने सुंदर पोस्टरसहित इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलीय.
बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं जोडपं कॅटरीना कैफ आणि विकी कौशल अखेर आई-बाबा झाले आहेत. दोघांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं असून, या आनंदाच्या क्षणी चाहत्यांसह संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कॅटरीना-विकीचं आयुष्य अधिक सुंदर बनलं असून, त्यांना एक ‘आशिर्वादच’ मिळाला आहे.
विकीने काय म्हटलंय पोस्टमध्ये?
''आमचा आनंद आला आहे. अपार प्रेम आणि कृतज्ञतेने, आम्ही आमच्या बाळाचे स्वागत करतो. ७ नोव्हेंबर २०२५ .. कॅटरीना आणि विकी''
कॅटरीनाने मुंबईतील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये आज सकाळी गोंडस मुलाला जन्म दिला. कॅटरीना आणि विकीने ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बडवारा येथे अत्यंत गोपनीय विवाह सोहळा केला होता. लग्नानंतर दोघेही सतत सोशल मीडियावर एकत्र दिसत असले तरी, त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच संयम पाळला आहे.