

rashmika mandanna vijay deverakonda wedding latest updates
मुंबई - अलीकडेच रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याचे वृत्त समोर आले असताना आता त्यांच्या लग्नाचीही चर्चा सुरु झालीय. रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत.
रश्मिका आणि विजय यांच्या साखरपुड्याच्या वृत्तानंतर लग्नाची चर्चा सुरु होती. दोघांच्याही हातात साखरपुड्याची अंगठी दिसली आहे. पण या सेलिब्रिटींकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही. रिपोर्टनुसार, टॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक असलेल्या रश्मिका आणि विजय आतापासून चार महिन्यांत लग्न करणार आहेत. राजस्थानमधील उदयपूरमधील एका आलिशान वाड्यात हा लग्न सोहळा पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. हे एक डेस्टिनेशन वेडिंग असेल. लग्नाबाबत दोघांकडूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण त्यांच्या लग्नाच्या बातमीने फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विजयच्या घरी साखरपुडा?
काही दिवसांपूर्वी दोघांच्या साखरपुड्याचे वृत्त येऊन धडकले होते. त्यावेळी त्यांनी अधिकृतपणे हा साखरपुड्याचा सोहळा पार पडल्याचे वृत्त जाहीर केले नाही. पण दोघांच्याही हातात साखरपुड्याची अंगठी दिसल्यानंतर त्यांचा साखरपुडा झाल्याचे कन्फर्म झाले.
दोन्ही सेलिब्रिटींच्या जवळच्या सूत्रांनी माध्यमांना माहिती दिली की, त्यांचा साखरपुडा ३ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयच्या हैदराबाद येथील घरी झाला. या समारंभात जवळच्या नातेवाईक-मित्रमंडळींना बोलावल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, रश्मिकाचा "थामा" चित्रपटाच्या प्रमोशनाच्या कार्यक्रमादरम्यान, रश्मिकाला विचारण्यात आले की, साखरपुड्याचे वृत्त सत्य आहे की अफवा? त्यावेळी रश्मिकाने लाजून उत्तर दिले, "सर्वांना याबद्दल माहिती आहे." यामुळे फॅन्स उत्साहित झाले. शिवाय आता रिपोर्टनुसार, विजयच्या जवळच्या सूत्रांनी खुलासा केला आहे की, हे दोघे पुढच्या वर्षी लग्न करण्याची योजना आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये दोघांच्या घरी सनई-चौघडे वाजण्याची शक्यता आहे.