'नवरी मिळे हिटलरला' : एजे- लीलाच्या रिसेप्शन मध्ये काय घडले?

परफेक्ट हिटलरच्या इम्परफेक्ट संसाराची सुरुवात !
Navri Mile Hitlerla tv show
नवरी मिळे हिटलरला मालिकाInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'नवरी मिळे हिटलरला' मालिका अनेक रंजक वळणं घेत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. अभिराम आणि लीलाची जोडी प्रेक्षकांना भावते आहे. नुकतंच वटपौर्णिमेला लीलाने एजेसाठी वडाच्या झाडाला १००१ प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा वाटलं की आता ह्यांचं नातं रुळावर येईल.

Navri Mile Hitlerla tv show
‘प्रेग्नेंसीत कोण हाय हिल्स घालतं?’ कल्कि 2898 एडी इव्हेंटमधील दीपिक पादुकोणचा व्हिडिओ व्हायरल
Summary

एजे-लीलाच्या आयुष्यात सगळंच गोड गोड कसं असेल. पण हळूहळू एजे-लीलाच्या संसाराची गाडी पुढे सरकत आहे. दोघे ही आजीच्या सांगण्यावरून एका खोलीत राहायला तयार होतात. जे एकमेकांच्या नजरेलाही नजर देत नाहीत त्यांच्यासाठी एका खोलीत राहणे म्हणजे तारेवरची कसरत असणार.

Navri Mile Hitlerla tv show
नवरी मिळे हिटलरला मालिकाInstagram

लीलाला कोणती मिळालीय कडक सूचना

एजेला एसी शिवय जमत नाही आणि लीला बिचारी एसी मध्ये गारठून जाते. लीलाला आहे अंधाराची भीती तर एजेला उजेडात झोपायची सवय नाही. पण ही तर फक्त सुरुवात आहे ह्यांच्या इम्परफेक्ट संसाराची. हे सर्व होत असताना एजे-लीलाच्या रिसेप्शनचा दिवस उजाडतो. लीलाला, कडक सूचना मिळालेय की मीडिया समोर काहीही बोलायचे नाही. पण जिथे लीला आहे तिथे तर जे व्हायचे नाही ते होणारच, मीडियाने लीलाला प्रश्न विचारून इतकं भांभावून सोडलंय लीलाच्या तोंडून असं काही निघत की सगळे हादरतात आणि तितक्यात एजे तिथे येतो. लीलाच्या रिसेप्शनमध्ये खास पाहुणी बनून लीलाची मैत्रीण वसुंधरानेदेखील हजेरी लावली.

Navri Mile Hitlerla tv show
अभिनेते शत्रुघ्न सिन्हा कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
Navri Mile Hitlerla tv show
नवरी मिळे हिटलरला मालिकाInstagram

लीला मीडिया समोर असं का बोलते जे ऐकून हादरतात ? एजे ही वेळ सावरून नेऊ शकेल ? हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल 'नवरी मिळे हिटलरला' मध्ये रोज रात्री १० वा. झी मराठीवर पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news