Navri Mile Hitlerla | लीलाचा जीव धोक्यात. एजे वाचवू शकेल लीलाला?

नवरी मिळे हिटलरला - लीलाचा जीव धोक्यात. एजे वाचवू शकेल लीलाला?
Navri Mile Hitlerla tv serial
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत अंतराचा वाढदिवस साजरा होणार आहे. Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत अंतराचा वाढदिवस साजरा होणार आहे. एजेसाठी हा दिवस खूप खास आहे. लीला एका मिशन मध्ये इतकी गुंतली आहे की २४ तास तिच्या डोक्यात फक्त तोच विषय चालू आहे. जो आहे अंतराचा मृत्यू कसा झाला आणि त्या मागचा सूत्रधार कोण आहे? सध्यातरी किशोरमुळे शंकेची सुई एजेवरच आहे. (Navri Mile Hitlerla)

Navri Mile Hitlerla tv serial
Kanguva Fire Song | कांगुवाचे फायर गाणे रिलीज; रॉकस्टार डीएसपी - बी प्राकचे म्युझिक

लीलाला पुरावे शोधण्यासाठी किशोरकडून सतत फोनवरून दबाव येत आहे. लीला पुरावा शोधण्यासाठी अंतराच्या कपाटाजवळ जाते आणि तेवढ्यात एजे तिला पाहतो आणि तिच्यावर रागावतो. एजे कडे एक अनमोल लॉकेट आहे ज्यात त्याचा आणि अंतराचा फोटो आहे आणि एजे ते फक्त अंतराच्या वाढदिवसाला बाहेर काढतो.

Navri Mile Hitlerla tv serial
Navra Maza Navsacha 2 Sequel | तब्बल १९ वर्षानंतर "नवरा माझा नवसाचा 2' चा सिक्वल

श्वेता अंतराच्या फोटोच्या जागी त्या लॉकेटमध्ये लीलाचा फोटो लावते. जेव्हा ते लॉकेट एजेच्या हातात येतं तेव्हा तो भयंकर चिडतो आणि लीलाला शिक्षा द्यायचं ठरवतो. लीलाला एजे कडून काय शिक्षा मिळेल? इकडे एजेला त्याच्या व्यावसायिक भागीदाराकडून रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण मिळाले आहे आणि त्याला लीलासोबत तिथे जायचे आहे, किशोरही त्यांच्या मागे जातो, तिथे एक अपघात होण्यापासून तो लीलाला वाचवू शकेल? काय आहे अंतराच्या मृत्यूमागचं सत्य? किशोर त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होईल ? ह्या सर्व प्रशांच्या उत्तरासाठी 'नवी मिळे हिटलरला' रोज रात्री १० वा. झी मराठीवर पाहा.

Navri Mile Hitlerla tv serial
Dharmaveer-2 चा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला? प्रतीक्षेत राहा 'या' दिवशी येणार चित्रपट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news