Navra Maza Navsacha 2 Sequel | तब्बल १९ वर्षानंतर "नवरा माझा नवसाचा 2' चा सिक्वल

श्री सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
navra maza navsacha 2 sequel
नवरा माझा नवसाचा 2 चित्रपट लवकरच भेटीला येतोयInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा" या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच "नवरा माझा नवसाचा २" चित्रपट येत आहे. २० सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एस टी बस प्रवासात "नवरा माझा नवसाचा" चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता "नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे. नुकतेच मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगावकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ उपस्थित होते.

navra maza navsacha 2 sequel
प्रभासच्या Kalki 2898 AD चा नवा रेकॉर्ड; १००० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट
Summary

"नवरा माझा नवसाचा" हा चित्रपट अल्पावधीतच कमालीचा हिट झाला होता. पहिल्या भागातला चमत्कारिक नवस फेडताना उडालेली तारांबळ अतिशय मनोरंजक ठरली होती. त्यामुळे आता "नवरा माझा नवसाचा २" मध्ये नक्की काय घडते ज्यामुळे रेल्वे प्रवास करावा लागतो, यासाठी अजुन रसिक प्रेक्षकांना थोडी वाट पाहायला लागणार आहे.

navra maza navsacha 2 sequel
Instagram

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत.

navra maza navsacha 2 sequel
Dharmaveer-2 चा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला? प्रतीक्षेत राहा 'या' दिवशी येणार चित्रपट
navra maza navsacha 2 sequel
Instagram

अशोक सराफ-सचिन पिळगावकर यांची धमाल

चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीजर देखील सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय "नवरा माझा नवसाचा चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता "नवरा माझा नवसाचा २"मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत.

navra maza navsacha 2 sequel
सरदार नव्हे तर सरदार जी...;दिलजीत दोसांझच्या 'सरदार जी ३' ची रिलीज डेट आली समोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news