

Angry Nana Patekar Video: अभिनेता नाना पाटेकरचा राग आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्या रागाची प्रचिती पुन्हा एकदा ओ रोमिओच्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यान आली. नाना जसे स्पष्टवक्ते आणि कोणाचीही भीड न बाळगता मते व्यक्त करणारे व्यक्ती आहेत. तसे ते वक्तशीर देखील आहेत. ते आपल्या व्यासायिक कमिटमेंटबद्दल खूप आग्रही आणि सजग आहेत.
७५ वर्षाच्या नाना पाटेकरांच्या याच कडक शिस्तीचा अनुभव आयोजकांना आला आहे. मुंबईतील मल्टीप्लेक्समधील एका कार्यक्रमावेळीचा नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाना पाटेकर यांना त्यांचे इतर सहकलाकार हे न आल्यामुळं जवळपास ६० मिनिटे वाट पहावी लागली. यावरून नाना पाटेकर आयोजकांवर जाम भडकले होते.
या व्हिडिओत नाना पाटेकर मल्टीप्लेक्समधून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी आयोजकांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नाना पाटेकर रागाने आयोजकांना हातातील घडळ्या दाखवत काहीतरी सांगत होते. समोरचा व्यक्ती नाना पाटेकर यांना मनवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र मानी पाटेकरांनी आयोजकांना नाही म्हणत थेट लिफ्ट गाठली. यावेळी ते मला एवढ्या लवकर का बोलवलं हे विचारताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार लोकांच्या समोरच झाला.
दरम्यान, कार्यक्रमादर्यान, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी नाना हे ट्रेलर लाँचपूर्वीच निघून गेल्यावर भाष्य केलं. विशाल म्हणाले, 'मला एक तास वाट पहावी लागली. मी आता चाललो आहे.'
ज्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटातील कलाकार शाहीद कपूर आणि त्रिप्ती दिम्री हे दुपारी १.३० मिनिटांनी आले. नाना पाटेकरांनी कार्यक्रम सोडून जाण्यावर विशाल भारद्वाज म्हणाले, 'नाना इथून निघून गेले आहेत. मात्र त्यांच्यासाठी बोललं पाहिजे. नाना आहेत त्यांच्यामध्ये एक खोडकर शाळकरी मुलगा असतो. तो वर्गातील सर्वाना दमदाटी करत असतो. सर्वांचे मनोरंजन करतो. ज्याच्या सोबत सर्व राहू इच्छितात, नानामध्ये तो मुलगा आहे.'
ओ रोमिओ चित्रपटाच्या निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, 'ओ रोमिओ ही एक रोमँटिक फिल्म आहे. हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटात शाहीद कपूर हा खूप लालची दाखवला आहे. शाहीदसोबतच त्रिप्ती दिम्री आणि नाना पाटेकर देखील या चित्रपटात आहेत.
तसेच अविनाश तिवारी, दिशा पटानी, फरिदा जलाल, अरूणा इराणी, विक्रम मेस्सी आणि तमन्ना भाटिया ही तगडी स्टारकास्ट देखील आहे. साजित नाडियदवाला या चित्रपटाचे निर्माते असून हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ ला म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे'च्या आदल्या दिवशी रिलीज होणार आहे.