अक्षय कुमारचे पाय धरले, म्हणाली वडिलांच्या डोक्यावर मोठे कर्ज, खिलाडीकुमारने दिले 'हे' उत्तर...

कर्जबाजारी वडिलांसाठी मुलीची विनवणी; अक्षय कुमार काय म्हणाला? जाणून घ्या सविस्तर
अक्षय कुमारचे पाय धरले, म्हणाली वडिलांच्या डोक्यावर मोठे कर्ज, खिलाडीकुमारने दिले 'हे' उत्तर...
अक्षय कुमारचे पाय धरले, म्हणाली वडिलांच्या डोक्यावर मोठे कर्ज, खिलाडीकुमारने दिले 'हे' उत्तर...
Published on
Updated on

bollywood a girl appealed to akshay kumar for financial help says my father is in debt video goes viral

मुंबई : पुढारी ऑनलाईन

आज गुरूवार अभिनेता अक्षय कुमार बीएमसीच्या मतदानासाठी आला होता. यावेळी मतदान करून पुन्हा जात असाताना एका छोट्या मुलीने त्‍याचे पाय पकडून मदतीची याचना केली.

अक्षय कुमारचे पाय धरले, म्हणाली वडिलांच्या डोक्यावर मोठे कर्ज, खिलाडीकुमारने दिले 'हे' उत्तर...
इराण युद्धाच्या उंबरठ्यावर? काश्मिरी विद्यार्थ्यांसह हजारो भारतीयांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, पालकांची मदतीची हाक

देशातील सर्वात समृद्ध महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसीसाठी आज (गुरूवार) मतदान होत आहे. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याच्यासह नाना पाटेकर तमन्ना भाटीया हे सिने कलाकारही आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते. या दरम्यान एका मुलीने अक्षय कुमारला थांबविले आणि त्‍याच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली. या दरम्यान अक्षय कुमारने कोणते उत्तर दिले जाणून घ्या...

अक्षयकडे मुलीने मागितली मदत, म्हणाली वडिल कर्जात आहेत

अक्षय कुमारने आज सकाळी मुंबईतील गांधी शिक्षण भवन येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर तो जात असताना एक मुलगी त्‍याच्याजवळ पोहोचली. हातात एक कागद घेत ती अक्षय कुमारला म्हणाली, माझे वडील मोठ्या कर्जात आहेत. त्‍यांना त्‍या कर्जातून बाहेर काढा. यावेळी सुरक्षा रक्षकांनी तिला आडवले. मात्र यावेळी अक्षय कुमार म्हणाला की, तुम्ही तुमचा नंबर द्या, ऑफिसमध्ये येउन जा. यानंतर मुलीने अक्षय कुमारचे पाय पकडले. मात्र यावेळी अक्षयने तिला असे करण्यापासून रोखले.

अक्षय कुमारचे पाय धरले, म्हणाली वडिलांच्या डोक्यावर मोठे कर्ज, खिलाडीकुमारने दिले 'हे' उत्तर...
Mohan Bhagwat On NOTA: 'राजा' नसणे म्हणजे अराजक... 'नोटा' वापरावर सरसंघचालक भागवतांनी दिली महाभारताचा दाखला

नेटिजन्सची प्रतिक्रिया.. म्हणाले, मदत केली तर मनापासून धन्यवाद

अक्षय कुमारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युजरने लिहिलंय की, तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. मुलीला मदत करा... एकाने लिहिलंय की, तुम्ही मदत केली तर मनापासून धन्यवाद. एका युजरने लिहिलंय की, तुम्हाला मदतीच्या लायक बनवलं आहे तर मदत केली पाहिजे.

अक्षयने लोकांना केले आवाहन

मतदानानंतर अक्षय कुमारने लोकांना आवाहन केले की, आज बीएमसी निवडणुकीसाठी मतदान होत आहे. एक मुंबईकर असण्यामुळे आज एक दिवस रिमोट कंट्रोल आपल्या हातात आला आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो की, जर आपणाला खरा हिरो व्हायचा असेल तर आपल्याला डायलॉगबाजी करायची नाही तर इथे येउन आपले मतदान करायचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news