टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरने आपला लोकप्रिय शो नागीनच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेबाबत नुकतेच रिव्हील केले आहे. बिग बॉसच्या वीकएंड वारच्या शेवटच्या एपिसोडमध्ये एकताने जाहीर केले की प्रियंका चहर चौधरी ही तिच्या सातव्या सीझन मधल्या नागीनच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. प्रियंकाच्या नावाची चर्चा सर्वतोपरी होती. पण आता एकतानेच हा सस्पेन्स कमी केला आहे. पण यापूर्वीच्या नागिन प्रमाणे प्रियंका फॅन्सना तितकीशी आवडलेली दिसत नाहीये. तिला संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. (Latest Entertainment News)
सोशल मीडिया फॅन्सनी मात्र प्रियंकाच्या या लूकवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अगदी या सीझनला फ्लॉप सीझन म्हणण्यापर्यंत अनेकांनी ही कमेंट केली. एक म्हणतो, ‘प्रियंका नागिनसाठी परफेक्ट आहे. पण तिचा आऊटफिट वेगळा असता तर अजून आकर्षक दिसली असती. एक म्हणतो, ‘प्लीज प्रियंकाचा लूक बदला. तर एकाने कपडे आणि ज्वेलरी बदलण्याविषयी सुचवले आहे.
तर एका युजरला एकता कपूरची निवड अजिबात आवडलेली दिसत नाही. तो म्हणतो, एकता कपूरच्या चॉइसला काय झाले आहे? मागचे सहा सीझन खरंच खूप छान होते. पण प्रियंकाकडून नागिनवाली वाईब अजिबातच येत नाहीये असेही एका चाहत्यांचे मत आहे.
या मालिकेत इश्क का रंग सफेद फेम अभिनेत्री ईशा सिंह आणि अभिनेता नामीक पॉल देखील दिसणार आहेत.
2015 मध्ये मौनी राय मुख्य भूमिकेत असताना ही सिरिज सुरू झाली होती. यानंतर अदा खान, तेजस्वी प्रकाश, सुरभि ज्योति, निया शर्मा, सुरभि चंदना आणि अनीता हसनंदानी या अभिनेत्री नागिन या व्यक्तिरेखेत दिसल्या आहेत.