

सेलिब्रिटींच्या नवीन नात्याच्या किंवा लग्नाच्या बातम्यांचे चाहत्यांना कौतुक असते. पण सध्या मराठी सेलिब्रिटींच्या चाहत्यांसाठी मात्र फारशी चांगली बातमी नाही. याला कारण आहे काही सेलिब्रिटींचे घटस्फोट किंवा त्याच्या शक्यता. सुरळीत संसार सुरू आहे असे वाटत असतानाच ते वेगळे होण्याच्या अफवा समोर येतात. याबाबत सध्या सगळ्यात नाव वर आहे ते योगीता चव्हाण आणि सौरभ चौघुले. (Latest EntEntertainment News)
या जोडीची भेट जीव माझा गुंतला मालिकेच्या सेटवर झाली होती. तिथेच ते दोघे प्रेमात पडले आणि लग्नाच्या बेडीतही अडकले. यानंतर योगीता बिग बॉसच्या घरातही गेली. पण काही कारणास्तव ती लवकर तिथून बाहेरही पडली. पण त्यानंतर मात्र या जोडीबाबत कोणतीही अपडेट आली नाही. तसेच एकत्र कुठे दिसलेही नाहीत. त्यांनी सोशल मिडियावरूनही एकमेकांना अनफॉलो केले आहे.
अभिनेता सुयश टिळक आणि आयूषी भावे हे या यादीतील दुसरे जोडपे आहे. 2021 मध्ये ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली. काही वर्षे सगळे सुरळीत सुरू होते. पण मध्येच अचानक दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले. तसेच लग्नाचे फोटोही डिलिट केले आहेत. इतकेच काय त्यांनी दिवाळीला एकमेकांसोबत एकही फोटो शेयर केला नाही.
'आई कुठे काय करते' या मालिकेत दिसलेली अभिनेत्री अक्षया गुरवच्या संसारातही सगळे काही ठीक नाही. अक्षयाने आठ वर्षांपूर्वी भूषण वाणीशी लग्न केलं. या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं असून लग्नाचे फोटोही काढून टाकले आहेत.