ShahRukh Khan: अधिकाऱ्यांनी मला घराबाहेर एक पाऊलही न टाकण्याबाबत बजावले होते; मन्नत फॅन मीटवर शाहरुखचा खुलासा

प्रत्येक वाढदिवासावेळी शाहरुख मन्नतच्या बाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत असतो
Entertainment
शाहरुख मन्नतच्या बाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत असतोPudhari
Published on
Updated on

किंग ऑफ रोमान्स आणि बॉलीवूड असलेल्या शाहरुखने त्याचा 60 वा वाढदिवस काल साजरा केला. आपल्या प्रत्येक वाढदिवासावेळी शाहरुख मन्नतच्या बाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत असतो. पण यावेळी साठाव्या वाढदिवसाचा मोठा इव्हेंट असूनही शाहरुखने चाहत्यांना मन्नतबाहेर भेटण्याचे टाळले. याचा खुलासा त्याने सोशल मीडिया पोस्टवर केला आहे. (Latest Entertainment News)

तो सोशल मीडिया पोस्टवर म्हणतो, ‘मला अधिकाऱ्यांनी सांगितले की मी बाहेर येऊन त्या सगळ्या लोकांना अभिवादन नाही करू शकत जे माझी वाट पाहात आहेत.’ पुढे तो म्हणतो, 'मी तुम्हा सर्वांची मनापासून क्षमा मागतो. परंतु, मला कळवण्यात आले आहे की गर्दी नियंत्रणाच्या (Crowd Control) समस्यांमुळे, हा निर्णय आपल्या सर्वांच्या एकूण सुरक्षिततेसाठी घेण्यात आला आहे. समजून घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! आणि माझा विश्वास करा, मला तुमची आठवण तुमच्यापेक्षा जास्त येईल. मी तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आणि प्रेम वाटण्यासाठी खूप उत्सुक होतो. तुम्हा सर्वांना खूप प्रेम.

Entertainment
Marathi Actor: फोटोतील या कलाकाराला ओळखले का? अभिनयासाठी सोडली आयटी क्षेत्रातली चांगल्या पगाराची नोकरी

या पोस्टवर शाहरुखच्या फॅन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकजण म्हणतो, ‘आज रात्री मुंबईचे रस्ते तुम्हाला मिस करतील.’ तर दुसऱ्या कमेंटमध्ये लिहिले होते की, 'किंग तुमची सुरक्षा आणि सगळ्यांचे भले होणे हे सर्वप्रथम आहे. तुमचे प्रेम बाल्कनीमध्ये न दिसताही आमच्यापर्यंत पोहोचते. काळजी घ्या आणि कायम चमकत रहा. शाह'.

Entertainment
Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या सोशल मीडिया स्टोरीने चाहते चक्रावले; वीण दोघांतली.. मालिका सोडणार?

वाढदिवासानिमित्त चाहत्यांना जबरदस्त गिफ्ट

60 व्या वाढदिवसानिमित्त शाहरुखने आगामी महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट किंगचा फर्स्ट लूक समोर आणला आहे. ग्रे हेअर, दातात किंगचे पान, कानात बाली आणि नजरेत दिसणारा थंडपणा असा लूक असलेला शाहरुख अनेकांना आवडतो आहे.

पठाण आणि जवाननंतर हा शाहरुखचा हटके कमबॅक मानला जातो आहे. विशेष म्हणजे यात लेक सुहानासोबत तो दिसतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news