

ekta kapoor naagin 7 season final lead Priyanka Chahar Choudhary
मुंबई - नागिन आपल्या सातव्या सीझनसाठी सज्ज होत आहे. दरम्यान, टीव्ही क्वीन एकता कपूरने नागिनसाठी सुंदर अभिनेत्री निवडल्याचे म्हटले जात आहे. रिपोर्टनुसार, बिग बॉस १६ ची कंटेंस्टेंट आणि आणि उडारियांमध्ये लोकप्रिय भूमिका साकारून अभिनेत्री एकता कपूरची हिट फ्रेंचायजी नागिनच्या सातव्या सीझनमध्ये ती दिसेल, असे म्हटले जात आहे.
एकता कपूरच्या टीमकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, पण सोशल मीडियावर प्रियांका चहर चौधरीचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. 'तिचं स्क्रीन प्रेझेन्स भन्नाट आहे; अशा प्रतिक्रिया फॅन्स देत आहेत. मौनी रॉय, सुरभी ज्योती, तेजस्वी प्रकाश यांसारख्या अभिनेत्रींच्या अभिनयामुळे नागिनच्या आदीचे फ्रेंचायजी घराघरात पोहोचल्या आहेत. आता प्रियांका चहर चौधरीचं नाव समोर आलं आहे.
‘नागिन ७’ मध्ये प्रियांका चहर चौधरीची एन्ट्री झाली तर मालिकेची लोकप्रियता नक्कीच अनेक पटींनी वाढेल, असं फॅन्सना वाटत आहे. शिवाय, प्रियंका चाहर चौधरी या फ्रेंचायजीची नवीन नागिन बनली तर मौनी आणि तेजस्वी सारख्या लोकप्रिय अभिनेत्रींना देखील टक्कर देईल, असे म्हटले जात आहे.
मालिकेत नागाच्या भूमिकेसाठी अविनाश मिश्राचे नाव समोर आले आहे. शिवाय, मोहसिन खान, शहीर शेख यांचीही नावे समोर आली होती. पण, अविनाशला फायनल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.