

Sai Pallavi and Junaid Khan Film
मुंबई - नितेश तिवारीचा ड्रीम प्रोजेक्ट ‘रामायण’ चित्रपटात काम करणारी अभिनेत्री साई पल्लवीच्या नव्या चित्रपटाचे नाव समोर आले आहे. हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट असून नव्या टायटल सोबत नवी रिलीज डेट देखील समोर आली आहे. साई पल्लवी आणि आमिर खानचा मुलगा जुनैद खान यांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. रिपोर्ट्सनुसार, ‘मेरे रहो’ चित्रपटाची कहाणी २०११ मध्ये रिलीज झालेला कोरियन चित्रपट ‘वन डे’वर आधारीत असेल. पण अद्याप याबबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा यावर्षी जुलै महिन्यात केली होती, आधी या चित्रपटाचे नाव ‘एक दिन’ असे ठेवण्यात आले होत. आता निर्मातयांनी चित्रपटाचे नाव बदलून ‘मेरे रहो’ असे केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांचे असून साई पल्लवी हिंदी चित्रपट इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरुवात करेल.
चित्रपट समीक्षक तरण आदर्शने ट्विट करून म्हटले आहे-"आमिर खान-मंसूर खान पुन्हा एकत्र आले. साई पल्लवी-जुनैद खान स्टारर चित्रपटाला नवं टायटल मिळालं आहे आणि नवी रिलीज डेट मिळालीय. 'मेरे रहो' नवं टायटल आहे चित्रपटाचे, यामध्ये जुनैद खान - साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. रिलीज डेट आता १२ डिसेंबर, २०२५ झालीय...दोघे 'जाने तू या जाने ना' नंतर जवळपास १७ वर्षांनी पुन्हा एकत्र आले आहेत."
या प्रोजेक्टमध्ये आमिर खान आणि मंसूर खान १७ वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. आमिर खान चित्रपटाची निर्मिती करत आहेत. दोघांनी याआधी इमरान खानचा जाने तू या जाने ना चित्रपटासाठी काम केलं होतं.