

farah khan class nehal and amaal malik in the bb19 house
मुंबई - बिग बॉस १९ च्या घरात रोज नवं काही तरी घडतय. अमाल मलिक असो वा नेहल या ना त्या कारणाने वाद सुरु अशतानाच आता नेहल आणि अमाल यांच्यात कॅप्टन्सी टास्क दरम्यान, वाद झाला. किरकोळ धक्काबुक्की होताच अमाल आणि नेहल दोघेही भडकले. नेहलने अमालवर गंभीर आरोप केले, ज्यामुळे घरचे वातावरण बिघडले.
नेहलने अमालवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला. नेहलने गदारोळ घातला की, त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले. यावेळी नेहल तिचा मित्र बसीरला आलिंगन देत खूप रडली.
नेहलच्या आरोपांवर अरमानने हात जोडून माफीही मागितली. आता विकेंड का वारमध्ये फराह खान या गोष्टीवरून नेहलला फटकारताना दिसेल.
बिग बॉसच्या टास्क शोमध्ये वूमन कार्ड प्ले करत असल्याची आठवण फराह खान नेहलला करून देणार आहे. नेहलला यावेळी तिला कार्ड मिळणार असून त्यावर वूमन कार्ड असे लिहिलेले असेल.
फराह नेहलला फटकारतानाचा प्रोमो समोर आलाय, ज्यामध्ये फराह म्हणते-नेहल तू जो मुद्दा उपस्थित केला आहेस, त्यामध्ये तू हो..हो म्हणत होतीस. तुम्ही जे लोक करत आहात, जे फेमिनिझमला १०० वर्ष मागे घेऊन जात आहे. शिवाय, फराह अमालवर राग व्यक्त करताना दिसते. कारण कोणतीही चूक नसताना तो वारंवार सॉरी म्हणताना दिसतो. यावर फराह म्हणते- तू सारखे सॉरी सॉरी का म्हणत आहेस. तुला माहिती नाही का, तुझी काही चूक नवहती.
अन्य प्रोमोमध्ये बसीर अली आणि नेहा चुडासामावर फराह भडकते. एकूणच विकेंड का वार धमाकेदार असून प्रेक्षकांचे लक्ष येत्या एपिसोडकडे लागून राहिले आहे.