Siddharth : पालकांना विमानतळावर त्रास दिला, रंग दे बसंती फेम अभिनेत्याचा आरोप

siddharth
siddharth

पुढारी ऑनलाईन डेस्क : रंग दे बसंती फेम साऊथ अभिनेता सिद्धार्थने (Siddharth) विमानतळावरील एक फोटो शेअर केला असून, आपल्या वृद्ध आई-वडिलांना सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्रास दिल्याचा आरोप त्‍याने केला आहे. मदुराई विमानतळावरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत केलेल्‍या पोस्‍टमुळे सिद्धार्थ चर्चेत आला आहे. (Siddharth)

सिद्धार्थने मदुराई विमानतळावरील फोटो शेअर केलाय. पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे, 'सीआरपीएफनं मदुराई विमानतळावर आम्हाला २० मिनिटे त्रास दिला. त्यांनी माझ्या वृद्ध पालकांना त्यांच्या बॅगमधून नाणी काढायला लावली. आम्ही त्यांना वारंवार इंग्रजीत बोलायला सांगितलं तरी देखील ते आमच्यासोबत हिंदीत बोलले. आम्ही त्यांचा निषेध केला. त्यानंतर ते म्हणाले, "भारतात हे असेच आहे.'

या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सिद्धार्थने पालकांना जो नाहक त्रास झाला, त्याविषयी आपले मत मांडले होते. रंग दे बसंती या बॉलिवूडपटातून सिद्धार्थने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. महासमुद्रम, चश्मेबद्दूर, स्ट्रायकर, या चित्रपटांमध्ये सिद्धार्थने काम केले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news