Musafir Cafe: 'मुसाफिर कॅफे' पाहून प्रेमात पडलात? वेब सिरीजमधल्या निसर्गरम्य ठिकाणी तुम्हीही राहू शकता, पण आहे कुठे?

Musafir Cafe Real Location: नेटफ्लिक्सवरील विक्रांत मॅसीच्या 'मुसाफिर कॅफे' सिरीजमध्ये दिसणारा सुंदर कॅफे हा प्रत्यक्षात मसुरीतील झरीपाणी कॅसल या हेरिटेज प्रॉपर्टीचा भाग आहे.
Musafir Cafe Real Location
Musafir Cafe Real LocationPudhari
Published on
Updated on

Musafir Cafe Real Location: विक्रांत मॅसीच्या 'मुसाफिर कॅफे' या रोमँटिक वेब सिरीजने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. वेब सिरीजमधील कथा जितकी चर्चेत आहे, तितकेच लोकेशन्सही चर्चेचा विषय ठरत आहेत.

विशेषतः डोंगरांच्या कुशीत वसलेला सुंदर लाकडी कॅफे पाहून अनेकांना हा केवळ चित्रपटासाठी उभारलेला सेट आहे की खरं ठिकाण आहे, असा प्रश्न पडला होता. मात्र, हा कॅफे खरोखरच अस्तित्वात असून तो उत्तराखंडमधील मसुरी येथे असलेल्या 'झरीपाणी कॅसल' (Jharipani Castle) या हेरिटेज प्रॉपर्टीचा भाग आहे.

'मुसाफिर कॅफे' सिरीजबद्दल

आठ भागांच्या या रोमँटिक सिरीजमध्ये विक्रांत मॅसी यांनी चंदर मोहन शर्मा ही भूमिका साकारली आहे, तर वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना हे सुधा आणि प्रीती यांच्या भूमिकेत आहेत. अभिनेते आदिल हुसेन यांचीही सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका आहे.

ही सिरीज लेखक दिव्य प्रकाश दुबे यांच्या 'मुसाफिर कॅफे' नावाच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित आहे. कथेत चंदरचे आयुष्य एका अनपेक्षित भेटीनंतर कसे बदलते आणि भूतकाळातील आठवणींशी झुंज देत तो डोंगरांमध्ये नवीन आयुष्य सुरू करण्याचा कसा प्रयत्न करतो, हे भावनिक पद्धतीने मांडण्यात आले आहे. सिरीजची कथा प्रामुख्याने भोपाळ आणि मसुरी या दोन ठिकाणांदरम्यानची आहे.

खऱ्या 'मुसाफिर कॅफे'चे खास वैशिष्ट्य

मालिकेत दिसणारा कॅफे हा मसुरीच्या झरीपाणी परिसरातील 'झरीपाणी कॅसल' या हेरिटेज प्रॉपर्टीचा भाग आहे. येथे लाकडी कॉटेज, हिरव्या छपरांची घरे, दरीकडे तोंड असलेले टेरेस आणि हिरवागार परिसर आहे. याच ठिकाणी सिरीजमधील अनेक महत्त्वाची दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत.

Musafir Cafe Real Location
Junaid Jantar Mantar: जंतर-मंतरवर मोफत जेवण देण्यासाठी जुनैदला पैसे कोणी दिले? कुटुंबीयांनी केला मोठा खुलासा

इथेच झाले सिरीजचे शूटिंग

प्रॉपर्टीच्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये या सिरीजचे शूटिंग येथे पार पडले. चित्रिकरणासाठी बाग, टेरेस, गेस्ट रूम्स आणि खास तयार करण्यात आलेल्या कॅफेचा वापर करण्यात आला. शूटिंगदरम्यान कलाकार आणि संपूर्ण चित्रपट युनिट याच प्रॉपर्टीमध्ये वास्तव्यास होते. दिवस आणि रात्री अशा दोन्ही वेळचे अनेक प्रसंग येथे चित्रित करण्यात आले.

झरीपाणी कॅसल कुठे आहे?

'झरीपाणी कॅसल' हे मसुरीतील प्रसिद्ध मॉल रोडपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शहराच्या गजबजाटापासून दूर, शांत आणि निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव येथे मिळतो. तसेच हे ठिकाण झरीपाणी धबधब्याजवळ असून देहरादूनपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. येथून दिसणारे मोठे डोंगर आणि दऱ्यांचे विहंगम दृश्य पर्यटकांना विशेष आकर्षित करते.

Musafir Cafe Real Location
Junaid Jantar Mantar: जंतर-मंतरवर मोफत जेवण देण्यासाठी जुनैदला पैसे कोणी दिले? कुटुंबीयांनी केला मोठा खुलासा

चाहत्यांनाही येथे राहता येणार

सर्वात खास बाब म्हणजे, सिरीजमध्ये दिसलेला हा कॅफे आणि प्रॉपर्टी पर्यटकांसाठी खुली आहे. येथे रस्टिक लॉग हट्स, व्हॅली-फेसिंग डिलक्स रूम्स आणि माउंटन व्ह्यू सूट्स अशा विविध प्रकारच्या निवासाची सुविधा उपलब्ध आहे. सिरीजमध्ये दाखवलेल्या काही खोल्यांमध्ये पर्यटक प्रत्यक्ष मुक्कामही करू शकतात.

'मुसाफिर कॅफे'च्या लोकप्रियतेनंतर या ठिकाणी भेट देण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. मसुरीतील झरीपाणी कॅसल हे ठिकाण आता अनेक पर्यटकांच्या 'बकेट लिस्ट'मध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news