Jana Nayagan Box Office Collection Day 5: ‘जन नायकन’च्या कमाईत घट, बॉक्स ऑफिसवर ५ दिवसांत किती कमाई?

Jana Nayagan Box Office Collection Day 5: ‘जन नायकन’च्या कमाईत घट, बॉक्स ऑफिसवर ५ दिवसांत किती कमाई?
Jana Nayagan
Jana Nayagan Box Office Collection
Published on
Updated on
Summary

थलपती विजयच्या 'जन नायकन'ने पहिल्या विकेंडमध्ये विक्रमी कमाई केल्यानंतर सोमवारी घसरण पाहयला मिळाली. पाचव्या दिवशी चित्रपटाने सुमारे १०.१५ कोटींची कमाई केली असून, भारतातील एकूण नेट कलेक्शन सुमारे १५७.७ कोटींवर पोहोचले आहे. जागतिक स्तरावरही चित्रपटाने२०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली असून त्याची बॉक्स ऑफिसवरील पकड कायम आहे.

Jana Nayagan Box Office collection updtes

थलपती विजय यांच्या जन नायकन रिलीज नंतर पहिल्या सोमवारच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. राजकारणात पाऊल ठेवण्याआधी अखेरचा चित्रपट जन नायकनमध्ये विजय यांनी काम केलं. हा चित्रपट २३ जुलै रोजी रिलीज झाला. आता रिलीजच्या पाचव्या दिवशी निराशाजनक कमाईचे आकडे समोर आले आहेत.

पाचव्या दिवशी ‘जन नायकन’च्या कमाईत घट

पहिल्या दिवशी चित्रपटाने ४२.७ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले होते. दुसऱ्या दिवशी २१.१५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी २८.९० कोटी रुपयांचा नेट गल्ला जमवला. आता पाचव्या दिवशीचे निराशाजनक आकडे समोर आलेले आहेत.

Jana Nayagan
Movie Kala Hiran Case | सलमान खानला मोठा दिलासा, सोशल मीडियावरून 'काला हिरण'शी संबंधित लिंक्स हटवण्याचे कोर्टाचे आदेश

मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या पाचव्या दिवशी ‘जन नायकन’ने देशात १० हजार ४३६ शो मधून १०.१५ कोटी रुपयांची नेट कमाई केलीय. भारतातील ग्रॉस कलेक्शन १५७.७४ कोटी रुपये झाले आहे. एकूण भारतातील नेट कलेक्शन १३४.९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तमिळ भाषेतील चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

परदेशात किती कमाई?

परदेशात पाचव्या दिवशी केवळ ४ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केलं. एकूण ग्रॉस कलेक्शन ७५.५० कोटी रुपये. तर एकूण वर्ल्डवाईड ग्रॉस कलेक्शन २३३.२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Jana Nayagan
Yash Ramayana behind the scenes|'रावण शिवभक्त होता म्हणून...'; यशने सांगितला 'रामायण'च्या सेटवरील खास किस्सा

केव्हीएन प्रोडक्शन्स बॅनर अंतर्गत वेंकट के. नारायणन यांची निर्मिती असलेल्या चित्रपटात पूजा हेगडे, ममिता बैजू, नासिर, प्रकाश राज, गौतम वासुदेव मेनन, नारायण आणि प्रियामणि यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोथ यांनी केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news