Trisha Krishnan Jana Nayagan : 'विजय'चा चित्रपट पाहण्यासाठी त्रिशा कृष्णनची हजेरी; व्हिडिओ व्हायरल, पहिल्याच दिवशी किती कमावले?

Trisha Krishnan Jana Nayagan : 'विजय'चा चित्रपट पाहण्यासाठी त्रिशा कृष्णनची हजेरी; व्हिडिओ व्हायरल, जन नायकनने पहिल्याच दिवशी किती कमावले?
Trisha Krishnan-Vijay thalapathy
Trisha Krishnan reached at theater for show Jana Nayaganpudhari photo
Published on
Updated on

थलपती विजयच्या अखेरच्या मानल्या जाणाऱ्या 'जना नायकन' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री त्रिशा कृष्णन चाहत्यांप्रमाणे थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी पोहोचली. 23 जुलै 2026 रोजी चेन्नईतील एका थिएटरमध्ये तिने पहिल्या शोचा आनंद घेतला.

त्रिशा यावेळी तिच्या आईसोबत थिएटरमध्ये आली होती. साध्या लूकमध्ये ती चाहत्यांमध्ये दिसली. पांढरा टी-शर्ट आणि निळी जीन्स आणि डोळ्यावर ब्लॅक गॉगल असा तिचा साधा पेहराव होता. तिच्या आगमनाची चाहत्यांना माहिती मिळताच थिएटर परिसरात मोठी गर्दी झाली.थिएटरबाहेरचा त्रिशाचा व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहत्यांनी तिचे जोरदार स्वागत केले आणि तिची एक झलक पाहण्यासाठी मोठी उत्सुकता दिसून आली.

'जन नायकन' हा थलपती विजयचा अभिनय कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट मानला जात आहे. त्यानंतर विजय पूर्णवेळ राजकारणावर लक्ष केंद्रित करणार असल्याने या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये विशेष भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे.

'जन नायकन'ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात

थलपती विजयचा बहुचर्चित 'जन नायकन' रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आणि अभिनेता म्हणून रिलीज झालेला हा विजयचा अखेरचा चित्रपट असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.

Trisha Krishnan-Vijay thalapathy
Ramayana |तुलसीदास यांच्या 'रामायण'मध्ये सीता मातेचं खास वर्णन, कुरळ्या केसांमध्ये साईला प्रेक्षक स्वीकारणार का? दीपिका चिखलिया काय म्हणाल्या?

मीडिया रिपोर्टनुसार, 'जन नायकन'ने पहिल्याच दिवशी भारतात ४१ कोटी रुपयांची नेट कमाई केली. तर परदेशात ३० कोटी रुपयांचा गल्ला जनवला. त्यामुळे चित्रपटाचे जागतिक ग्रॉस कलेक्शन 78.27 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

व्हिडिओ- WION Showbiz x account वरून साभार

देशांतर्गत कमाईत तमिळ आवृत्तीने 36.50 कोटी रुपये, तेलुगू भाषेतील चित्रपटाने 2.75 कोटी रुपये, तर हिंदी भाषेत 1.75 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपटाचे 13,067 शो रिलीज करण्यात आले.

Trisha Krishnan-Vijay thalapathy
Atharva Sudame on Subodh Bhave | सुबोध भावेंनी या शॉर्टफिल्मसाठी मानधन घेतले नाही; अथर्वने सांगितला किस्सा

या चित्रपटात थलपती विजयसोबत ममिता बैजू, बॉबी देओल आणि पूजा हेगडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे ३०० कोटी रुपयांचे बजेट असून दिग्दर्शन एच. विनोथ यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news