Mirzapur The Movie BO: ‘मिर्झापूर’ची बॉक्स ऑफिसवर दहशत! 4 दिवसांत किती कोटी कमावले? अनेक चित्रपटांचे विक्रम मोडणार

Mirzapur The Movie Box Office Collection: ‘मिर्झापूर द मूव्ही’ने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात करत अवघ्या चार दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
Mirzapur The Movie Box Office Collection
Mirzapur The Movie Box Office CollectionPudhari
Published on
Updated on

Mirzapur The Movie Box Office Collection: अली फजल आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मिर्झापूर द मूव्ही’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. ‘गुड्डू भैया’, ‘मुन्ना भैया’ आणि ‘कालीन भैया’ यांसारखी लोकप्रिय पात्रे मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही ही उत्सुकता बॉक्स ऑफिसवरील कमाईत दिसून येत आहे. ‘मिर्झापूर द मूव्ही’ने अवघ्या चार दिवसांत 100 कोटी रुपयांचा नेट कलेक्शनचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, सोमवारच्या दिवशीही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा मोठी ओपनिंग

ट्रेड अ‍ॅनालिस्ट आणि समीक्षकांनी ‘मिर्झापूर द मूव्ही’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा अंदाज सुमारे 18 ते 20 कोटी रुपये व्यक्त केला होता. मात्र, चित्रपटाने अंदाजापेक्षा मोठी सुरुवात करत पहिल्याच दिवशी 25.75 कोटी रुपयांची कमाई केली.

यानंतर शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली. दुसऱ्या दिवशी ‘मिर्झापूर द मूव्ही’ने तब्बल 32 कोटी रुपये कमावले. रविवारी प्रेक्षकांचा प्रतिसाद आणखी वाढला आणि चित्रपटाने 36 कोटी रुपयांची कमाई केली.

सोमवारी कमाईत स्वाभाविकपणे काहीशी घट झाली असली, तरी चित्रपटाने 15.50 कोटी रुपयांची कमाई केली. वीकडेजमध्येही कमाईचा वेग कायम राहिल्याने चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील पकड मजबूत असल्याचे दिसून येत आहे.

चार दिवसांत 109 कोटींचा गल्ला

‘मिर्झापूर द मूव्ही’च्या आतापर्यंतच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत एकूण 109.25 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे.

  • शुक्रवार : 25.75 कोटी रुपये

  • शनिवार : 32 कोटी रुपये

  • रविवार : 36 कोटी रुपये

  • सोमवार : 15.50 कोटी रुपये

  • एकूण : 109.25 कोटी रुपये

रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची निर्मिती सुमारे 80 ते 90 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे चार दिवसांतच चित्रपटाने आपल्या निर्मिती खर्चापेक्षा अधिक नेट कमाई केली आहे.

Mirzapur The Movie Box Office Collection
Pach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’चा दमदार फर्स्ट लूक समोर; कीर्तनविश्वाची भन्नाट गोष्ट, चित्रपटाची उत्सुकता वाढली

‘मिर्झापूर’च्या लोकप्रियतेचा चित्रपटाला फायदा

‘मिर्झापूर’ ही वेब सीरिज 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या या सीरिजने काही वर्षांत मोठा चाहतावर्ग निर्माण केला. कालीन भैय्याचा दबदबा, मुन्ना भैय्याची दहशत आणि गुड्डू पंडितचा संघर्ष यामुळे ‘मिर्झापूर’मधील पात्रे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली.

यानंतर सीरिजचे आणखी दोन सीझन आले आणि गुड्डू पंडितच्या बदल्याची कथा पुढे सरकत गेली. आता हीच लोकप्रिय स्टोरी मोठ्या पडद्यावर आणण्यात आली आहे.

Mirzapur The Movie Box Office Collection
Toxic OTT Deal: ‘टॉक्सिक’चा भाव अचानक कोसळला! अगोदर 150 कोटींची ऑफर नाकारली; आता फक्त इतके कोटी मिळणार, मेकर्सना मोठा झटका

थिएटरमध्येही प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद

‘मिर्झापूर द मूव्ही’मध्ये सीरिजमधील लोकप्रिय पात्रे पाहायला मिळत आहे. चित्रपटाची कथा सीरिजच्या पुढील घटनांशी जोडलेली असली, तरी ती स्वतंत्रपणे पुढे नेण्यात आली आहे.

गुड्डू भैया आणि मुन्ना भैया यांसारख्या पात्रांची लोकप्रियता तसेच ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता याचा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठा फायदा होताना दिसत आहे. पहिल्या चार दिवसांतील कमाई पाहता आगामी दिवसांत चित्रपट आणखी मोठा गल्ला जमवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वीकडेजमध्येही कमाईचा वेग कायम राहिला आणि आगामी दिवसांत प्रेक्षकांचा प्रतिसाद असाच राहिला, तर ‘मिर्झापूर द मूव्ही’ बॉक्स ऑफिसवर आणखी नवे विक्रम करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news