Toxic OTT Deal:4. ‘टॉक्सिक’चा भाव अचानक कोसळला! अगोदर 150 कोटींची ऑफर नाकारली; आता फक्त इतके कोटी मिळणार, मेकर्सना मोठा झटका

Toxic OTT Deal: यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपेक्षाभंगानंतर त्याच्या OTT डीललाही मोठा फटका बसल्याची चर्चा आहे.
Toxic OTT Deal
Toxic OTT DealPudhari
Published on
Updated on

Toxic OTT Deal: यशच्या ‘टॉक्सिक’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवरील कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे आता चित्रपटाच्या OTT आणि सॅटेलाइट राइट्सच्या किमतीवरही त्याचा परिणाम झाल्याची चर्चा आहे.

रिपोर्टनुसार, ‘टॉक्सिक’ला रिलीजपूर्वी एका आघाडीच्या OTT प्लॅटफॉर्मने तब्बल 150 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र, निर्मात्यांनी त्यासाठी 200 कोटी रुपयांची मागणी केली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवेल आणि त्यानंतर डिजिटल राइट्स आणखी महागात विकता येतील, असा निर्मात्यांचा अंदाज होता.

मात्र, रिलीज झाल्यानंतर चित्र वेगळेच दिसू लागले. रिपोर्टनुसार, आता ‘टॉक्सिक’ला OTT प्लॅटफॉर्मकडून केवळ 30 कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर्स मिळत आहेत. यामध्ये ZEE5 कडून सर्वाधिक ऑफर असल्याचे सांगितले जात आहे.

600-700 कोटींच्या बजेटला बॉक्स ऑफिसवर मोठा धक्का

रिपोर्टनुसार, ‘टॉक्सिक’ची निर्मिती तब्बल 600 ते 700 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत चित्रपटाची एकूण कमाई सुमारे 239 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ट्रेड विश्लेषकांच्या अंदाजानुसार चित्रपटाची अंतिम कमाई जवळपास 250 कोटी रुपयांपर्यंत थांबू शकते.

चित्रपटाच्या मोठ्या बजेटच्या तुलनेत ही कमाई अत्यंत कमी असल्याने निर्मात्यांसमोर नुकसान भरून काढण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. थिएटरनंतर OTT आणि सॅटेलाइट राइट्समधून काही प्रमाणात भरपाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता डिजिटल राइट्सची किंमतही मोठ्या प्रमाणात घसरल्याचे वृत्त आहे.

OTT रिलीजसाठी ‘टॉक्सिक’चं एडिटेड व्हर्जन?

दरम्यान, चित्रपटातील काही दृश्यांमुळे सॅटेलाइट प्रसारणातून अपेक्षित कमाई मिळण्याची शक्यता कमी असल्याचेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे निर्माते चित्रपटात काही बदल करून एडिटेड व्हर्जन OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे.

या नव्या व्हर्जनच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मकडून अधिक रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र, ‘टॉक्सिक’चा एडिटेड व्हर्जनच OTTवर प्रदर्शित होणार असल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Toxic OTT Deal
Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला, चांदीही स्वस्त

पहिल्या दिवशी 101 कोटींची कमाई, तरीही अपेक्षाभंग

‘टॉक्सिक’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 101 कोटी रुपयांची नेट कमाई केल्याचे सांगितले जाते. यशचा ‘KGF 2’नंतरचा मोठा चित्रपट असल्याने त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती.

Toxic OTT Deal
Delhi Building Collapse Video: दिल्ली हादरली! पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; थरकाप उडवणारा VIDEO समोर

मात्र, पुढील काही दिवसांत चित्रपटाच्या कमाईचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला. प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही चित्रपटाला संमिश्र, तसेच मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने प्रदर्शित झालेल्या ‘टॉक्सिक’ला बॉक्स ऑफिसवर मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news