

मिलिंद सोमणने पावसाळ्यात वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिमचा आधार घेतला नाही. त्याने फक्त रोज एक जादुई ट्रीक वापरली. या छोट्या बदलांमुळे त्याने सहजपणे ६ किलो वजन घटवले.
Milind Soman weight loss journey
मुंबई - साठ वर्षीय अभिनेता, सुपरमॉडल मिलिंद सोमनने वयाच्या ६० व्या वर्षी तब्बल ६ किलो वजन कमी केले आहे. खास बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचा वर्कआऊट त्याने केलेला नाही. कोणतीही जिम, रनिंग न करता केवळ डाएट ट्रिकने त्याने आपले वजन कमी केले आहे. मिलिंद सोमनने वयाच्या साठीमध्ये १६:८ इंटरमिटेंट फास्टिंग करत प्रयोग केला आणि त्याचे वजन कमी होत गेले आणि ऊर्जा वाढल्याने अनेक मोठे फायदे झाले. डाएटमध्ये बदल करून त्याला चांगला अनुभव आला.
सुपरमॉडल मिलिंद सोमनने नुकताच एका मुलाखतीत सांगितले की, त्याला एक जादुई ट्रीक मिळाली, ज्यामुळे एक, दोन नाही तर तब्बल ६ किलो वजन कमी केलं. मिलिंद सोमनने नोव्हेंबर २०२४ मध्ये वयाच्या ५९ व्या वर्षी इंटरमिटेंट फास्टिंग केल्याचा खुलासा केला. ‘मेड इन इंडिया’ फेम मॉडलने सांगितलं की, ''मी प्रयोग केला, मागील नोव्हेंबरमध्ये, मी १६:८ इंटरमिटेंट फास्टिंग सुरू केले, फक्त हे पाहण्यासाठी की, हे कसे वाटते पाहुया आणि मला खूप छान वाटलं.''
''खरंतर, माझे वजन उतरले आणि मल माहिती नव्हते की, मला वजन कमी करायचं आहे. मिलिंद सोमनने मजेत हे देखील म्हटले की, त्याला नेहमी वाटायचं की, तो परफेक्ट आहे आणि त्याच्या आसपासच सर्व लोक देखील असे म्हणत होते. पण ६ किलो वजन कमी झाल्यानंतर माझ्यात अधिक उर्जा होती.''पण नंतर हाफ-आयरनमॅन मॅराथनमध्ये गेल्यानंतर त्याला इंटरमिटेंट फास्टिंग बंद करावी लागल्याचे, त्याने सांगितले.
काय म्हणाला मिलिंद सोमन?
मिलिंद म्हणाला, "तुम्हाला प्रत्येक वेळी जे मिळतं, ते खावं लागतं. हे एक एंड्योरेंस इव्हेंट आहे." "मी पुन्हा हा प्रयोग केला नाही. पण हा एक अद्भुत अनुभव होता." कारण मला एक पूर्ण आयरन मॅन मॅरेथॉन पार पाडायचं आहे.”
मिलिंदने दिला हा सल्ला
तो शक्य असेल तेवढ पॅकेज्ड फ़ूड पासून दूर राहतो. त्याची पत्नी, अंकिता कोंवर पॅकेज्ड फ़ूड खाते, जे त्याला अजिबात आवडत नाही.
काय आहे इंटरमिटेंट फास्टिंग आहे?
जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनने सांगितलं आहे की, इंटरमिटेंट फास्टिंग अशी एक पद्धत आहे की, ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती एका योग्य वेळेत जेवते. अनेक सायंटिफिक स्टडीजवरून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, या कंट्रोल्ड पॅटर्नमध्ये जेवल्याने लोकांना ऑर्गेनिकली वजन कमी करण्यात मदत मिळते.
एका रिपोर्टनुसार, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ फेम अभिनेत्री आलिया भट्टने १६:८ इंटरमिटेंट फास्टिंग करून केवळ तीन महिन्यात १६ किलो वजन कमी केलं होतं. न्यूट्रिशनिस्ट, डॉ. सिद्धांत भार्गवने ही गोष्ट सांगितली होती.