IFFI Dharmendra tribute | इफ्फी समारोपात धर्मेंद्र यांना दिला जाणार भावूक निरोप, प्रार्थना सभेचेही आयोजन?

IFFI closing ceremony dharmendra tribute | इफ्फी समारोपात धर्मेंद्र यांना दिला जाणार भावूक निरोप, प्रार्थना सभेचेही आयोजन?
image of dharmendra
IFFI closing ceremony dharmendra tributeInstagram
Published on
Updated on
Summary

इफ्फीच्या समारोप सोहळ्यात अभिनेता धर्मेंद्र यांना विशेष श्रद्धांजली देण्यात येणार आहे. त्यांच्या कारकिर्दीवरील व्हिडिओ प्रस्तुती, मान्यवरांचे उद्गार आणि प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येईल. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

IFFI closing ceremony dharmendra tribute

पुढारी ऑनलाईन डेस्क - गोव्यातील ५६ व्या ​​इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार सकाळी मुंबईमध्ये धर्मेंद्र यांनी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर इफ्फीमध्ये त्याना भावूक निरोप देणार असल्याचे म्हटले जात आहे. याआधी इफ्फीमध्ये 'फिल्म बाजार सेगमेंट'च्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये धर्मेंद्र यांच्या आत्‍म्यास शांती मिळावी, यासाठी एक मिनिटांचे मौन ठेवण्यात आले होते. आता आयोजकांकडून निश्चित करण्यात आले आहे की, फेस्टिव्हलच्या फिनालेमध्येच 'ही-मॅन'ला एक खास श्रद्धांजली दिली जाईल.

IFFI मध्ये 'शोले'ची 4K स्‍क्रीनिंग होणार नाही?

धर्मेंद्र आणि अमिताभ बच्‍चन यांचा ऑल टाइम ब्लॉकबस्‍टर 'शोले' चित्रपट १२ डिसेंबर, २०२५ रोजी ४K व्हर्जनमध्ये चित्रपटगृहात रि-रिलीज होणार आहे. रिपोर्टनुसार, ५६ व्या ​​इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया, गोवामध्ये चित्रपटाचे ४K मध्ये स्क्रीनिंग रद्द करण्यात आली आहे. यामागील कारण 'मेकर्सकडून तांत्रिकदृष्ट्या समस्या असल्याचे म्हटले जत आहे. दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि चित्रपटाची मुख्य अभिनेत्री हेमा मालिनी रेड कार्पेटवर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पुढे काय होईल, हा अंदाज व्यक्त केला जाऊ शकत नाही.

या आठवड्यात होणार धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना सभा

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल परिवाराला भेटण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक सेलेब्‍स जात आहेत. मंगळवारी रात्री उशीरा राणी मुखर्जी, कृती सेनॉन, जितेंद्र, अमीषा पटेल जुहू येथील धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी जाताना दिसले.

image of dharmendra
Bigg Boss Marathi-6 चा धमाकेदार टीझर, रितेश देशमुख की महेश मांजरेकर, कोण करणार होस्ट?

अहान पांडे वडिलांसोबत पोहोचला

सैयारा फेम अहान पांडे आपल्या वडिलांसह देओल परिवाराला भेटण्यासाठी पोहोचला. आता एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या आठवड्यात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पण ठिकाण कोणते? हे अद्याप समोर आलेले नाही.

image of dharmendra
Celina Jaitly : १४ वर्षांनंतर संसारात मीठाचा खडा! सेलिनाचे पतीवर घरगुती हिंसाचार, शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news