

Aditya Roy Kapur-Sara Ali Khan Metro in Dino Trailer
मुंबई - अनुराग बसु दिग्दर्शित मेट्रो…इन दिनों चित्रपटाचा ट्रेलर आज ४ जून रिलीज झाला आहे. आदित्य रॉय कपूर, सारा अली खान आणि अन्य स्टार्स देखील हा रोमँटिक ड्रामा ४ जुलैला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटातील पहिले गाणेदेखील रिलीज करम्यात आले होते.
अभिनेत्री सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्रामवर आगामी मेट्रो इन दिनों ट्रेलर पोस्ट केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'प्रत्येक वयोगटातील एक कहाणी...ही केवळ आमची लव्ह स्टोरी नाही- ही तुमची देखील आहे. मेट्रो…इन दिनों ट्रेलर जारी. ४ जुलै २०२५ चित्रपटगृहात तुमची स्वत:ची कहाणी पाहा.'
धर्मेंद्र आणि नफीसा अलीच्या जागी नीना गुप्ता आणि अनुपम खेर यांनी घेतली आहे. ही लव्ह स्टोरी प्रेक्षकांना आवडेल, असे म्हटले जात आहे. कोंकणा सेन-पंकज त्रिपाठी यांची जोडी देखील कमालीची आहे.
'मेट्रो इन दिनों'चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. 'जमाना लगे' असे बोल असलेल्या गाण्याला म्युजिक मास्टर प्रीतम सह अरिजीत सिंह - शाश्वत सिंह यांनी आवाज दिला आहे. 'मेट्रो इन दिनो' २००७ चा चित्रपट 'लाईफ इन ए… मेट्रो' चा सीक्वल आहे. नव्या चित्रपटात अली फजल, फातिमा सना शेख, नीना गुप्ता, अनुपम खेर, सास्वता चॅटर्जी यांच्याही भूमिका आहेत.