

रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात पुण्यातून काही आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने करण्यात आलेल्या दाव्यांमुळे तपास अधिक गंभीर झाला. यामध्ये मूळचा अकोल्याच्या शुभम लोणकरचे नाव समोर आले आहे. कोण आहे तो? याबद्दल पूर्ण बातमी वाचा
rohit shetty firing on house case : who is shubham lonkar linked up to bishnoi gang
प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातून काही संशयितांना ताब्यात घेतलं असलं, तरी अकोल्याच्या शुभम लोणकर याचे नाव समोर आले आहे. या प्रकरणाचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी त्याचे कनेक्शन आहे का? त्याने रोहित शेट्टीच्या घरावर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतलीय. चित्रपटसृष्टीतील नावांना धमक्या दिल्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील शेट्टी टॉवर निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडवली आहे. या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित कुख्यात गँगस्टर शुभम लोनकर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. यानंतर तासाच्या आत, 'शुभम लोणकर आरजू बिश्नोई' (Shubham Lonkar Aarzoo Bishnoi) नावाच्या फेसबुक पेजवर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा एक मेसेज दिसला.
शुभम लोणकर आरा बिश्नोई, हरी बॉक्सर आणि हरमन शांडू-याच्या नावाने रोहित शेट्टी यांच्या घरावर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली. पोस्टमध्ये कामात हस्तक्षेप करू नका, असे अनेकदा सांगितले; पण ऐकले नाही.' हा केवळ ट्रेलर आहे आणि ऐकले नाही तर गोळ्या 'छातीत घातल्या जातील' म्हणत बॉलिवूड उद्योगालाही धमकी देण्यात आली आहे.
कोण आहे शुभम लोणकर?
दरम्यान हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या नेव्हरी या गावचा रहिवासी आहे. आधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल ३ पिस्टलसह काही जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या.
लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते. शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार होता. अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. शुभम गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, त्यानंतर तो फरार होता. त्यावेळी शुभमला पुण्यातून अटक झाली होती त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.
एकेकाळी पुण्यातून कारभार करणाऱ्या कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कथित सदस्य म्हणून शुभम लोणकरचे नाव समोर येते.
- २७ जानेवारी रोजी, पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात चित्रपट फायनान्सर सनी वाघचौरे यांना खंडणीसाठी धमक्या दिल्याप्रकरणी शुभमविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.
- १ फेब्रुवारी रोजी पहाटे १२.४५ च्या सुमारास मुंबईतील जुहू येथील बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत शुभमचे नाव सोमर आले.
फायनान्सर सनी वाघचौरे यांना धमक्या दिल्याप्रकरणी आणि बाबा सिद्दीकी खून प्रकरणात शुभम लोणकरचे नाव समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी पुण्यातील पाच जणांना अटक केली असून, ते शुभमसोबतच्या संबंधित लोकांची चौकशी करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर, २०२४ रोजी मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.