Mardaani 3 BO collection | राणी मुखर्जीला शाहरुख खानचा पाठिंबा, ‘मर्दानी ३’ची बॉक्स ऑफिसवर भरारी

Mardaani 3 Box Office | राणी मुखर्जीला शाहरुख खानचा पाठिंबा, ‘मर्दानी ३’ची बॉक्स ऑफिसवर भरारी
image of Rani Mukerji
Mardaani 3 BO collection first day x account
Published on
Updated on
Summary

राणी मुखर्जी अभिनीत ‘मर्दानी ३’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. दमदार कथा, सामाजिक संदेश आणि राणीच्या सशक्त अभिनयामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. यशराज फिल्म्सच्या या चित्रपटाला शाहरुख खानने उघडपणे पाठिंबा दिल्याने चर्चेला आणखी उधाण आले आहे. पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने समाधानकारक कमाई करत ‘मर्दानी’ फ्रँचायझीची ताकद पुन्हा सिद्ध केली आहे.

SRK Cheers for His ‘Mardaani' Rani Mukerji as 'Mardaani 3' Soars at the Box Office

राणी मुखर्जी पुन्हा एकदा ‘मर्दानी ३’मधून दमदार अवतारात प्रेक्षकांसमोर आली असून, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार भरारी घेतली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत राणी मुखर्जीने याआधीही प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि तिसऱ्या भागात तिचा अभिनय अधिक परिपक्व आणि प्रभावी वाटतो आहे. बॉक्स ऑफिसच्या बाबतीत मर्दानीने पहिल्याच आठवड्यात समाधानकारक कमाई केली आहे. मल्टिप्लेक्ससोबतच सिंगल स्क्रीन थिएटर्समध्येही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

image of Rani Mukerji
Alia Bhatt | अल्फानंतर आलिया भट्टची नवी घोषणा, 'डोंट बी शाय'मध्ये आलिया रोमँटिक अवतारात

यशराज फिल्म्स बॅनरच्या या चित्रपटाची अभिनेत्री राणीला शाहरुख खानने उघडपणे पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर शाहरुख खानने चित्रपटाचे कौतुक करत राणी मुखर्जीच्या अभिनयाचे विशेष उल्लेख केले आहेत.

चित्रपटाच्या रिलीज दिवशीच, बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने आपली जुनी मैत्रीण आणि सहकलाकार राणी मुखर्जीसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त केल्या. एक्स अकाऊंटवर शाहरुख खानने लिहिले- मनापासून… माझ्या ‘मर्दानी’ राणीला खूप खूप शुभेच्छा. मर्दानी 3 मध्येही तू जशी खऱ्या आयुष्यात आहेस तशीच निर्भीड, ताकदवान आणि संवेदनशील पडद्यावर दिसशील, याची मला पूर्ण खात्री आहे. @yrf #Mardaani3 #RaniMukerji

image of Rani Mukerji
Bigg Boss Marathi-6|घरात वातावरण तंग.. 'माझ्या कॅरेक्टरवर बोलायचं नाही’, तन्वीचा पारा चढला अन्..

अभिराज मिनावाला दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित मर्दानी ३ आहे. मूळच्या मर्दानी चित्रपटात मानवी तस्करीच्या भयावह वास्तवावर प्रकाश टाकला. तर मर्दानी २ मध्ये एका क्रूर सिरियल गुन्हेगाराच्या विकृत मानसिकतेचा उलगडा करण्यात आला. आता तिसऱ्या भागात गुन्हेगारी, महिला सुरक्षेचे प्रश्न आणि पोलिस यंत्रणेतील संघर्षाची वास्तव कथा आहे.

राणी मुखर्जीसाठी मर्दानी ३ ठरला खास

मर्दानी ३ चे प्रदर्शन राणीसाठी विशेष ठरले. कारण याच वर्षी राणी मुखर्जी तिच्या सिनेसृष्टीतील ३० वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे.

'मर्दानी ३' बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिला दिवस

राणी मुखर्जीच्या थ्रिलर चित्रपटाची सुरुवात स्थिर झाली असून ३ कोटींहून अधिक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी समाधानकारक सुरुवात केली असून भारतातील कमाई ३.८० कोटी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news