

अल्फा चित्रपटानंतर आलिया भट्टने ‘डोंट बी शाय’ या नव्या प्रोजेक्टची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. यावेळी ती पूर्णपणे रोमँटिक अंदाजात दिसणार असून, तिच्या या नव्या अवताराबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Alia Bhatt new project announced Dont Be Shy
बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून आलिया भट्टकडे पाहिले जाते. अल्फा या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आलेली आलिया पुन्हा चर्चेत आहे. 'पोचर' सारख्या वेब सीरीजच्या यशानंतर आलिया ॲमेझॉन प्राईम व्हिडिओसोबत एक मोठा प्रोजेक्ट करणार आहे. रोमँटिक-कॉमेडी 'डोंट बी शाय'ची घोषणा करण्यात आली असून ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर त्याची घोषणा केलेली आहे.
मजेशीर रोमँटिक अवतारात आलिया
आलिया आणि तिची बहिण शाहीन भट्टच्या प्रोडक्शन हाऊस 'इटरनल सनशाईन प्रोडक्शन्स'ने प्राईम व्हिडिओ सोबत मिळून आपला पुढील ओरिजिनल चित्रपट 'डोंट बी शाय'ची अधिकृत घोषणा केली आहे.
या चित्रपटाची खासियत म्हणजे आलिया मजेशीर हलक्या फुलक्या कॉमेटी अवतारात दिसेल.
आलिया घेऊन येतेय 'शाय'ची कहाणी
चित्रपटाची कहाणी २० वर्षाच्या श्यामिली 'शाय' दासच्या अवती भोवती पिरते. श्यामिलीचे आयुष्य खूप शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध असते. पण तेव्हाच कहाणीमध्ये एक अनपेक्षित ट्विस्ट येतं. मी-ज्यामुळे तिच्या आयुष्यचं बदलतं. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते आणि तिथेनच तिच्या जीवनाचा एख वेगळा प्रवास सुरु होतो.
यासंर्भात आलियाने सोशल मीडियावर पोस्टदेखील केली आहे.
'डोंट बी शाय'ची लेखिका, दिग्दर्शिका स्रीति मुखर्जी आहे. त्यांनी याआधी 'ये जवानी है दीवानी', 'ऐ दिल है मुश्किल', 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' यासारख्या चित्रपटांवर काम केलं आहे.
आलियाची अशी असेल भूमिका
आलिया 'डोंट बी शाय'मध्ये एका २० वर्षाच्या मुलीच्या भूमिकेत असेल. याशिवाय ती यशराज फिल्म्सचा चित्रपट 'अल्फा'ची देखील तयारी करत आहे. ती पहिल्यांदाच 'YRF स्पाई यूनिवर्स' च्या चित्रपटात एका महिला गुप्तहेरच्या मुख्य भूमिकेत दिसत आहे. यामध्ये आलिया सोबत शर्वरी वाघ देखील असेल.