यंदाचे वर्ष करिअरसाठी गेम चेंजर ठरेल : प्राजक्ता माळी

prajkta gaikwad
prajkta gaikwad
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री, कवयित्री, नृत्यांगना, सूत्रसंचालिका अशी आपली वैविध्यपूर्ण ओळख प्राजक्ता माळी हिने निर्माण केली आहे. २०२२ या वर्षी प्राजक्ता माळी आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवतेय. निर्माती बनण्यासाठी ती जेवढी झटून काम करत आहे. तेवढीच सध्या ती आपल्या ॲक्टिंग प्रोजेक्टसाठीही उत्सुक आहे.

प्राजक्ताच्या यंदा चार नव्या कलाकृती रसिकांसमोर येतील. लकडाऊन, पावनखिंड,चंद्रमुखी हे सिनेमे आणि रानबाजार ही वेबसीरिज यंदा रिलीज होणार आहे. लकडाऊन चित्रपटातून ती पहिल्यांदाच अंकुश चौधरीसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पावनखिंड चित्रपटामुळे युध्दपटाचा भाग होण्याची संधी तिला पहिल्यांदाच मिळालीय. चंद्रमुखी सिनेमातून पहिल्यांदाच ती सुप्रसिध्द संगीत-दिग्दर्शक अजय-अतूलच्या गाण्यावर नाचताना दिसणार आहे. तर रानबाजार ह्या वेबसीरिजमधून ती पहिल्यांदाच वेश्या व्यवसायातील एका स्त्रीची भूमिका रंगवताना दिसेल. रानबाजार वेबसीरिजने प्राजक्ताचं ओटीटी विश्वात पदार्पण होतंय.

याविषयी प्राजक्ता म्हणते, "२०२२ माझ्या बकेटलिस्ट मधील अनेक स्वप्न पूर्ण करणार असंच दिसतंय. २०१३ पासून मी अभिनय क्षेत्रात आहे. अंकुशदादासोबत सिल्वर स्क्रीन शेअर करताना, यंदा तुम्ही मला पहिल्यांदाच पाहाल. लकडाऊनमध्ये मी आजच्या काळातल्या मुलीच्या भूमिकेत दिसेन तर त्यानंतर रिलीज होणाऱ्या पावनखिंड सिनेमातून श्रीमंत भवानीबाई बांदल ह्या एका राणीच्या भूमिकेत दिसेन. त्या अगदी विरूध्द भूमिकेत अर्वाच्य शिव्या देताना मी रानबाजारमध्ये दिसेन. अभिनेत्री म्हणून चाकोरीबाहेरील आणि वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा रंगवाव्यात, असं नेहमीच वाटत होतं. यंदा ती इच्छा पूर्ण होतेय."

प्राजक्ता पुढे म्हणते, "माझ्या बकेटलिस्ट मधल्या अजून दोन गोष्टी यंदा होणार आहेत. अजय-अतुल यांच्या संगीताची मी चाहती आहे. त्यांच्या एखाद्या गाण्यावर आपल्याला डान्स करायला मिळावा, असं मला गेली काही वर्ष वाटतं होतं. ही माझी इच्छा यंदा चंद्रमुखी सिनेमातून पूर्ण होतेय. दुसरं म्हणजे, निर्माती होण्याचं स्वप्न. माझ्या शिवोहम प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होतंय.."

२०२१ मध्ये रिलीज झालेल्या पांडू सिनेमात प्राजक्ता नकारात्मक भूमिकेतून दिसली होती. या सिनेमाचा सिक्वल बनण्याची शक्यता चित्रपटाच्या क्लायमॅक्समधून दिसून आलीय. याविषयी प्राजक्ता म्हणते,"सोज्वळ चेहरा असल्याने माझ्याकडून नकारात्मक भूमिकेची अपेक्षा कोणी केली नव्हती.पण हा चित्रपट रिलीज झाल्यावर लोकांच्या प्रतिक्रियांमधून ही भूमिका त्यांना आवडतेय, हे लक्षात आलं. आता सिक्वलविषयी अद्याप मला माहित नाही. पण पांडू-२ बनला आणि माझी त्यात भूमिका त्यात असेल,तर मला नक्कीच आवडेल. सध्यातरी मी एवढंच म्हणेन की, हे वर्ष माझ्यासाठी गेमचेंजर ठरू शकतं."

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news