नागपूर : उच्‍चशिक्षित तरुणीकडून चैनीसाठी तब्‍बल २० ठिकाणी चाेरी; पाेलिसही चक्रावले | पुढारी

नागपूर : उच्‍चशिक्षित तरुणीकडून चैनीसाठी तब्‍बल २० ठिकाणी चाेरी; पाेलिसही चक्रावले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: सत्तावीस वर्षांची एक सुशिक्षित तरुणीची घरची परिस्थिती तशी सधन. तिचे दोन विषयांत एम. ए. झाले आहे. तरी तिने गेल्या काही दिवसांपूर्वी तिने चोरी केली त्यानंतर तिला चोरी करण्याची सवयच जडली. तरूणी गर्दीच्या ठिकाणी जावून महिलांच्या पर्समधून रोख रक्कम लंपास करण्याचा सपाटा लावला होता. तर याचदरम्यान अशाच प्रकारचे गुन्हे घडत असल्याने पोलीस त्रस्त झाले होते. बर्डी पोलिसांनी या तरूणीला पकडल्यानंतर तिने चक्क वीस चोऱ्यांची कबुली दिली. “तू चांगल्या घरची आहेस. उच्च शिक्षित आहेस; मग, चोरी कशाला करतेस?’, असे पोलिसांनी तिला विचारले.  ” तुम्हाला नाही कळणार, साहेब, चोरी का करतात’ असे उत्तर दिले.या उत्तराने पोलिसही चक्रावून गेले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नागपूर पोलीस गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या पर्समधून होणाऱ्या चोऱ्यांमुळे त्रस्त होते. चोराचा पत्ता लागत नव्हता. पण, आता याप्रकरणी एका महिलेला त्यांनी अटक केली. कारण जाणून घेतले असता पोलीसही चक्रावले गेले आहेत.

सदरील तरूणी होस्टेलवर राहायची. पण, घरून मिळालेल्या पैशांवर मौज करता येत नव्हती. त्यामुळे तिने काही महिलांबरोबर चोरीला सुरुवात केली. त्यानंतर हिस्से वाटणीवर त्याच्यात वाद झाला. तेव्हा तिने एकटीनेच चोरी करण्यास सुरूवात केली. आतापर्यंत तिने वीस ठिकाणी चोऱ्या केल्या असून त्यातून मिळालेल्या रक्कमेतून तिने मौजमजा केली असल्याचे तिने सांगितले आहे. दागिने विक्रीसाठी गेल्यास सोनार आपले बिंग फोडेल, अशी भीतीने तिने चोरीत मिळालेले दागिने लपवून ठेवले होते.

जुळलेले लग्नही तुटले

संबंधित तरुणीचे लग्न जुळले होते. परंतु, ती चोरी करत असल्याची माहिती मुलाकडील मंडळींना मिळाली. यानंतर त्‍यांनी लग्‍न माेडले. सीताबर्डी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तिला अटक केली. “तू चांगल्या घरची आहेस. उच्च शिक्षित आहेस. मग, चोरी कशाला करतेस?’, असे पोलिसांनी तिला विचारले. यावर तिने ” तुम्हाला नाही कळणार, साहेब, चोरी का करतात’ असे ठामपणे म्हणाली. तिचे  हे उत्तर ऐकून पाेलिसही  च्रकाावले.

हेही वाचलंत का? 

Back to top button