‘स्पायडर मॅन : नो वे होम’ : भारतात २०० कोटी कमाई, तर जगभरात १०,००० कोटी | पुढारी

‘स्पायडर मॅन : नो वे होम’ : भारतात २०० कोटी कमाई, तर जगभरात १०,००० कोटी

पुढारी ऑनलाईन

‘स्पायडर मॅन : नो वे होम’ हा चित्रपट रीलिज होऊन आता महिना होत आला आहे. हल्ली प्रत्येक चित्रपटाचे भवितव्य पहिल्याच आठवड्यात स्पष्ट होते, या चित्रपटाचे कवित्व अद्याप सुरू आहे. तर ‘नो वे होम’ने भारतात 200 कोटींची कमाई केली आहे आणि भारतात एवढी कमाई करणारा हा हॉलीवूडचा आतापर्यंतचा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी मार्व्हल स्टुडियोच्याच ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ने 222 कोटी कमावले होते तर ‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’ने 365 कोटींची कमाई भारतात केली होती. दरम्यान, ‘स्पायडर मॅन : नो वे होम’ने जगभरातून आतापर्यंत 1.37 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 10,200 कोटींची कमाई केली आहे.

विशेष म्हणजे, भारताप्रमाणेच चीनमधून हॉलीवूडपटांची मोठी कमाई होत असते. चीन हॉलीवूडसाठी मोठे मार्केट आहे; पण अद्याप हा चित्रपट चीन आणि जपानमध्ये रीलिज झालेला नाही, तरीही चित्रपटाने 10 हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Back to top button