secrets of kohinoor :”सिक्रेट्स ऑफ कोहिनूर”मधून मनोज वाजपेयी पुन्हा भेटीला

manoj bajpayee
manoj bajpayee

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी यांच नाव कायम चर्चेत असतं. सध्या तो वेब सीरिजमध्ये पुन्हा दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलीय. (secrets of kohinoor) याआधीही मनोजच्या भूमिकांनी अनेक वेब सीरीजमधून चाहत्यांना भुरळ घातली आहे. द फॅमिली मॅन, द फॅमिली मॅन २, द सीक्रेट्स ऑफ सिनौली या वेब सीरीजनंतर आता अभिनेता मनोज वाजपेयीची 'सिक्रेट्स ऑफ कोहिनूर' ही वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (secrets of kohinoor)

सिक्रेट्स ऑफ कोहिनूर ही बेव सीरीज नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केली आहे. नीरज पांडे यांच्या सीक्रेट्स ऑफ सिनौली या बेवसीरीजचा हा दुसरा भाग आहे. सीक्रेट्स ऑफ सिनौली नंतर अभिनेता मनोज वाजपेयी यांची 'सीक्रेट्स ऑफ कोहिनूर' मध्ये भूमिका कशी असेल याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे .

अभिनेता मनोज वाजपेयी यांनी सीक्रेट्स ऑफ कोहिनूरचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. चित्रपटाचे कथानक अन्याय आणि लुटमारवर आधारित असल्याचे स्पष्ट केले आहे . ही वेब सीरीज ४ ऑगस्टला डिस्कवरी प्लसवर रिलीज होईल. कोहिनूर हिऱ्याशी संबधित ही रहस्यमय  कथानक असल्याचे म्हटले जात आहे.

दिग्दर्शक नीरज पांडे यांनीदेखील सिक्रेट्स ऑफ कोहिनूरचे पोस्टर ट्विटरवर शेअर करत मी अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यासोबत एकत्र येऊन काम करायला एक्सायटेड आहे. मी मनोज वाजपेयी यांच्यासोबत सीक्रेट्स फ्रॅंचाईज या वेब सीरीजचा दुसरा भाग सीक्रेट ऑफ कोहिनूर धघेऊन येत आहे. याचा प्रिमीयर ४ ऑगस्टला डिस्कवरी प्लसवर रिलीज होईल, असं ट्विटरवर म्हटलं आहे.

हेदेखील वाचलं का?-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news