साबरमती ट्रेन दुर्घटनेचे सत्य 'ॲक्सीडेंट ऑर कांस्पिरेसी गोधरा'मधून समोर येणार

'ॲक्सीडेंट ऑर कांस्पिरेसी गोधरा' साबरमती ट्रेन दुर्घटनेचे सत्य उलगडणार?
Accident Or Conspiracy Godhra - Trailer
साबरमती ट्रेन दुर्घटनेचे सत्य उलगडणारAccident Or Conspiracy Godhra - youtube

पुढारी ऑनलाईन डेस्क : २२ वर्षांपूर्वी घडलेली साबरमती ट्रेन दुर्घटनेवर आधारित चित्रपट "ॲक्सीडेंट ऑर कांस्पिरेसी गोधरा"चा रोमांचक असा ट्रेलर रिलीज करण्यात आला. सत्य घटनेवर आधारित फिल्म्स प्रेक्षकांना जास्त प्रभावित करतात. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दावा केला आहे की, हा चित्रपट देखिल त्या घटनेची बरीच पाने उलगडणार आहे.

Accident Or Conspiracy Godhra - Trailer
फिटनेस आयकॉन सोनू सूदचं वर्कआऊट व्हायरल, फतेहसाठी अशी घेतली मेहनत
Summary

आगीच्या ज्वालांमध्ये जळणाऱ्या निरपराध लोकांच्या किंकाळण्याच्या आवाजाने ट्रेलरची सुरुवात होते. वकिलाच्या भूमिकेत रणवीर शौरी म्हणतो की साबरमती ट्रेन जाळली गेली नाही तर जळत ठेवली गेली. बाहेर एक महिला मीडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारते, "हजारो लोकांची हत्या, गँगरेप हे षड्यंत्र नाही तर दुसरे काय आहे".

साबरमती ट्रेनच का?

रणवीर शौरी आपले मत ठामपणे मांडताना म्हणतो की ,"प्रशासन आपला बेजबाबदारपणा लपवण्यासाठी फक्त एकच गोष्ट उगाळत आहे. जेव्हा हल्ला झाला तेव्हा आरपीएफ कुठे होती? फायरब्रिगेड कुठे होती? साबरमती ट्रेनला असे जळत ठेवणे हा एक कट होता. या वक्तव्याला विरोध करत वकील मनोज जोशी आपले मत मांडत असताना ट्रेनच्या आवाजामध्ये त्यांचा आवाज विरळ होऊन जातो. त्यात एक मनुष्य हा प्रश्न विचारतो की साबरमती ट्रेनच का?

Accident Or Conspiracy Godhra - Trailer
संदीप पाठक म्हणतोय 'जगात भारी पंढरीची वारी'

ट्रेलरच्या दुसऱ्या भागात अतिशय भावूक दृश्ये आहेत, एक मनुष्य आपल्या पत्नीला ट्रेनमध्ये सोडण्यासाठी आला आहे. अभिनेत्री डेनिशा घुमरा म्हणाली, "तुम्ही असा निरोप घेत आहात की, मी पुन्हा न येण्यासाठी कायमची जात आहे." ट्रेलरच्या शेवटी, लोकप्रिय गुजराती अभिनेता हितू कनोडियाचे पात्र एक मोठा प्रश्न विचारात आहे की, ५९ लोक या ट्रेन अपघातात मारली गेली. त्यापैकी एकाच नाव तरी माहित आहे का? जळणाऱ्या निष्पाप लोकांच्या किंकाळ्याने चित्रपटाचा ट्रेलर संपतो.

Accident Or Conspiracy Godhra - Trailer
विजय थलपतीसोबत चर्चेत आलेल्या त्रिशा कृष्णनचे शिक्षण झालंय तरी किती

'ॲक्सीडेंट ऑर कांस्पिरेसी गोधरा' मध्ये हे असतील कलाकार

ओम त्रिनेत्र फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात रणवीर शौरी, मनोज जोशी, हितू कनोडिया, देनिशा घुमरा, अक्षिता नामदेव, गणेश यादव आणि राजीव सुर्ती यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट नानावटी मेहता आयोगाच्या अहवालावर आधारित आहे, ज्याला या घटनेची चौकशी करण्याचे काम देण्यात आले होते. पहिल्यांदाच एक बॉलिवूड चित्रपट आहे जो एका आयोगाच्या अहवालावर आधारित एखाद्या घटनेचे सत्य प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.

काय म्हणतात चित्रपटाचे दिग्दर्शक एम. के. शिवाक्ष?

तरुण दिग्दर्शक एम. के. शिवाक्ष म्हणतो, “गोध्रा घटनेमागील सत्य सर्वांसमोर आणणे हाच माझा मुख्य उद्देश आहे. हा चित्रपट कोणत्याही जाती किंवा पंथाला टार्गेट करत नाही तर एका घटनेचे सत्य उलगडून दाखवत आहे, ज्याचा वापर काही लोकांनी स्वत:च्या फायद्यासाठी केला आणि आजवर लोकांची दिशाभूल करण्यात आली.

साबरमती दुर्घटनेचे सत्य काय आहे?

निर्माता बी. जे पुरोहित गोधरा संदर्भात बोलताना म्हणाले, "आता प्रेक्षकांना साबरमती ट्रेन दुर्घटनेचे सत्य पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही कारसेवकांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. निष्पाप मुले, महिला आणि वृद्धांना ट्रेनमध्ये जिवंत का जाळण्यात आले. साबरमती दुर्घटनेचे सत्य काय आहे, हे एक षड्यंत्र होते की दुर्घटना, या सगळ्यामागे कोणती लोक होती, असा वाद अनेक दशकांपासून न्यायालयात सुरू आहे.

यादिवशी येणार 'ॲक्सीडेंट ऑर कांस्पिरेसी गोधरा'

"अपघात किंवा कांस्पिरेसी, गोधरा" हा चित्रपट भीषण ट्रेन हल्ल्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर बनविण्यात आला आहे . आजपर्यंत न्याय न मिळालेल्या दुःखद भूतकाळाबद्दल प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पडणाऱ्या चित्रपटाचा टीझर समोर येताच चर्चा सुरू झाली होती. सेन्सरबाबतच्या विविध अडथळ्यांमुळेही हा चित्रपट चर्चेत आला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विविध टप्प्यांवर चाचण्या घेण्यासाठी निर्मात्यांना बराच काळ वाट पाहावी लागली. पण आता मात्र या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले असून १२ जुलै रोजी हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीसोबतच हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news