

मामूटीने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करत दिग्दर्शक खालिद रहमानसोबत पहिल्यांदाच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या कोलॅबोरेशनमुळे मलयाळम सिनेसृष्टीत उत्सुकता वाढली असून, चित्रपटाबाबत अधिक माहितीसाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
मल्याळम अभिनेता मामूटीने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. लवकरच ते एका नव्या चित्रपटात दिसणार असल्याचे जाहीर केले आहे. ही माहिती त्यांनी सोशल मीडिया फेसबूकवरून दिली आहे. सुपरस्टार मामूटीने चित्रपट निर्माता खालिद रहमान यांच्यासोबत काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. आगामी चित्रपट क्यूब्स एंटरटेनमेंट्स बॅनर अंतर्गत निर्मिती केली जाईल.
खालिद रहमान हा मलयाळम सिनेसृष्टीतील एक तरुण आणि प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांमध्ये वेगळा दृष्टिकोन, वास्तववादी मांडणी आणि आधुनिक कथा पाहायला मिळतात.
मामूटीने फेसबूकवर दिली माहिती
मामूटीने फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. एक पोस्टर आहे, त्यावर लिहिलंय-'मामूटी, खालिद रहमान, शरीफ मुहम्मद'. कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'क्यूब्स एंटरटेनमेंट सोबत आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा करताना आनंद होत आहे. त्याचे दिग्दर्शन खालिद रहमान करत आहेत.
'उंडा'मध्ये सोबत केलंय काम
हा चित्रपट अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यामध्ये २०२९ चा चित्रपट 'उंडा' नंतर हे दुसरे कोलॅबोरेशन असेल. या चित्रपटात मामूटीने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. शाईन टॉम चाको, अर्जुन अशोकन आणि जेकब ग्रेगरी, ईश्वरी राव, रणजीत यांच्या देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. मामूटी शेवटचा "कलामकावल" चित्रपटात दिसला होता.
मामूटी विषयी थोडेसे...
मामूटी एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. त्याने मल्याळम चित्रपटांसोबतच तमिळ, तेलगू, हिंदी आणि कन्नड या भाषांमध्येही काम केले आहे. त्याने ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मामूटीने त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्री यांचा समावेश आहे.