Rapper Hirandas Murali Rape Case | रॅपर हिरनदास मुरलीवर बलात्काराचा गंभीर आरोप; लगेच सुटका

Rapper Hirandas Murali Rape Case - रॅपर हिरनदास मुरलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल
image of Rapper Hirandas Murali
Rapper Hirandas Murali arrested and Escape Rape Case x account
Published on
Updated on

Rapper Hirandas Murali arrested and Escape Rape Case

मुंबई - संगीतविश्वात लोकप्रिय होत असलेला मल्याळम रॅपर हिरनदास मुरली (वेदन) याचे नाव गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहे. एका तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर बलात्कारासह अन्य गंभीर गुन्ह्यांखाली त्याच्याविरोधात केस नोंदवली गेलीय. या घटनेमुळे साऊथ मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मल्याळम रॅपर हिरन दास मुरली उर्फ वेदनला अटक करून सुटका करण्यात आली. बलात्कार प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. पण त्याला जामीन मिळाल्याने त्याची सुटका करण्यात आली. संपूर्ण प्रकरण काय?

रॅपरवर तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे. केरळ हायकोर्टातून आधीच त्याला अटकपूर्व जामीन मिळाला. त्यामुळे तयाला अटक करणे केवळ एक औपचारिकता होती. कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर वेदन त्याच संध्याकाळी तुरुंगातून बाहेर आला.

कोर्टाने वेदनला निर्देश दिले की, मंगळवारपासून दोन दिवसांसाठी तपास टीमच्या समोर हजर व्हावे. ५ तासांच्या चौकशीनंतर त्याला मंगळवारी सोडण्यात आले आणि बुधवारी पुन्हा हजर होण्यास सांगण्यात आले होते.

वैद्यकीय तपासानंतर सुटका

बुधवारी चौकशी नंतर पोलिसांनी वेदनला मेडिकल तपासासाठी घेऊन गेले आणि नंतर पोलिस स्टेशनला आणून त्याची सुटका करण्यात आली.

image of Rapper Hirandas Murali
Prajakta Koli Nepal Protest | अराजकतेमुळे खुद्द नेपाळची सून म्हणाली- "हे पाहून जाणं अशक्य!" प्राजक्ताचा भावनिक खुलासा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

एका डॉक्टरने आरोप केला होता की, वेदनने २०२१ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री केली. काळानुरुप त्यांच्यातील नाते आणखी घट्ट झाले. वेदनने लग्नाचे वचन दिले. आणि २०२१ ते २०२३ दरम्यान, कोझिकोड, कोच्ची आणि अन्य ठिकाणी शारीरिक संबध बनवले. तक्रारदाराने जामीन याचिकेचा विरोध करत सांगितले की, वेदनने या प्रकारणे अन्य तरुणींना देखील धोका दिला आहे. पण, रिपोर्टनुसार, कोर्टाने सांगितले की, प्रत्येक केस स्वतंत्रपणे हाताळायला हवे.

image of Rapper Hirandas Murali
Baaghi 4 BO Collection: टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या ॲक्शन ड्रामाची कमाई कासवगतीने, कमावले इतके कोटी

मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांवर आरोप होणे ही नवीन बाब नाही. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अशा प्रकरणांमध्ये अडकणे हे करिअरसाठी धोकादायक आहे. रॅपर हिरनदास मुरलीचे अनेक गाणी तरुण वर्गामध्ये लोकप्रिय झाली होती. त्याच्या लाईव्ह परफॉर्मन्सेसला प्रचंड गर्दी व्हायची. पण आता या आरोपांमुळे त्याचे कॉन्सर्ट्स आणि ब्रँड कोलॅबोरेशन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news