Baaghi 4 BO Collection: टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या ॲक्शन ड्रामाची कमाई कासवगतीने, कमावले इतके कोटी

Tiger Shroff Baaghi 4 Box Office Collection: टायगर श्रॉफ-संजय दत्तचा ॲक्शन ड्रामा कासव गतीने, देशात कमावले इतके कोटी
image of Tiger Shroff-Harnaaz Kaur Sandhu
Baaghi 4 Box Office Collection uppdates Instagram
Published on
Updated on

Baaghi 4 Box Office Collection Day 5

मुंबई - टायगर श्रॉफच्या बागी -४ ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. पण नंतर, धिम्या गतीने कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. तिकिट बारीवर पाच केवळ ५ दिवसांत, साजिद नाडियाडवालाच्या चित्रपटाने ३९.७९ कोटी कमावले आहेत. चित्रपटाने पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवार ९ सप्टेंबरला ४.९४ कोटींची कमाई केली. त्यामुळे चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रियांसह सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसवर टिकून राहिल्या आहेत.

image of Tiger Shroff-Harnaaz Kaur Sandhu
Sanjay Kapoor Sirf Tum | केरळमधील 'परम सुंदरी'चे शूटिंग पाहताच संजय कपूरची खास पोस्ट व्हायरल, वाचाच
image of Tiger Shroff
Tiger ShroffInstagram

टायगर श्रॉफ आणि संजय दत्त स्टारर 'बागी ४' चित्रपटाला आठवड्याच्या मध्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिकीट खिडकीवर अनेक स्पर्धक असल्याने कमाईचा प्रवास आव्हानात्मक बनला आहे. बागी-४ हा चित्रपट ८० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे आणि आतापर्यंत त्याने त्याच्या खर्चाच्या ५९ टक्के रक्कम वसूल केली आहे. कोरोना काळानंतर, टायगर श्रॉफचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून 'बागी-४' चे नाव पुढे आले आहे. असेही म्हटले जात आहे की, 'बडे मियाँ छोटे मियाँ' (६६ कोटी) विरुद्ध त्याची स्पर्धा असेल.

image of Tiger Shroff-Harnaaz Kaur Sandhu
'प. बंगालमध्ये 'The Bengal Files' वरील बंदी हटवावी', पंतप्रधान मोंदीना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
टायगर दाखवणार कमाल?
रिपोर्टनुसार, 'बागी ४' ने परदेशात १० कोटींची कमाई केली आहे. देशांतर्गत कमाईसह, जगभरातील कमाई ६५.७४ कोटींवर पोहोचली आहे. या चित्रपटाने टायगर श्रॉफच्या 'मुन्ना मायकल' (४८.३८ कोटी) आणि 'अ फ्लाईंग जट' (५७.४९ कोटी) या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. अजय देवगनचा सन ऑफ सरदार २ ने बॉक्स ऑफिसवर केवळ ६५.३८ कोटी कमावले होते.

Baaghi 4 Worldwide Box Office Day 5

बजेट : ८० कोटी

भारतातील एकूण कमाई : ४७.२४ कोटी

परदेशातील एकूण कमाई : १० कोटी

वर्ल्डवाईड एकूण कमाई: ६५.७४ कोटी

बागी-४ चे कलाकार

ॲक्शन ड्रामाने भरपूर चित्रपटात टायगर शिवाय संजय दत्त, सोनम बाजवा, हरनाज संधू, शीबा आकाशदीप साबिर, श्रेयस तळपदे, सौरभ सचदेवा, उपेंद्र लिमये यासारखे कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news