

Prajakta Koli on Nepal Protest
मुंबई - जेन-जीच्या निषेधाचे वादळ असताना अभिनेत्री प्राजक्ता कोळीने आपली नेपाळची ट्रीप रद्द केली. नेपाळमधील बिकट परिस्थिती पाहता अभिनेत्रीने हा निर्णय घेतला. नेपाळमध्ये सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा आरोप हजारो तरुण-तरुणींनी काठमांडूमध्ये केला. जोरदार आंदोलन सुरु असताना अनेक हिंसा झाली. वातावरण अशांत झालं. दरम्यान, प्राजक्ताने आपला नेपाळ दौरा रद्द केला.
प्राजक्ताने वृषांक खनालसोबत २५ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्न केले आहे. तो नेपाळचा असून तिचा बॉयफ्रेंड होता. प्राजक्ता अभिनेत्री, यु-ट्यूबर आहे. तिने नेपाळमधील सध्यस्थिती पाहता भावना व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. ती म्हणाली की, प्राजक्ता नेपाळमधील अशांततेने खूप व्यथित झाली आहे. दिसणारे दृश्य आणि बातम्या पाहून तिचं मन हेलावून गेलं आहे. तिने पीडित लोकांप्रती आपला पाठिंबा दर्शवला
मंगळवारी, प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली. तिने नेपाळमधील अशांततेबद्दल तिची चिंता आणि दुःख व्यक्त केलं. खरोखरच ही घटना हृदयद्रावक असल्याचं तिनं म्हटलं. त्यामुळे अशावेळी कोणतेही सेलिब्रेशन करणं योग्य नाही, असं प्राजक्तानं म्हटलं. ज्या कुटुंबांचे नुकसान झालं आहे, त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय. मी नपाळला येणार होते आणि तुम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक होते, पण आता ती योग्य वेळ नाही. पण लवकर भेटू, असंही तिनं म्हटलं आहे.
दरम्यान, नेपाळमधील या आंदोलनामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. भारतासह अनेक देशांतील पर्यटकांनी आपले ट्रीप पुढे ढकलले किंवा रद्द केले आहेत. प्राजक्ता कोळीचा हा निर्णय त्याचाच एक भाग ठरतो.