Malaika Arora | मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? कोण आहे सोराब बेदी? व्हायरल व्हिडिओने डेटिंगच्या चर्चांना उधाण

who is Sorab Bedi?- कोण आहे सोराब बेदी? मलायकाच्या 'त्या' व्हिडिओने रंगली डेटिंगची चर्चा
malaika arora-orab bedi
Malaika Arora dating rumours with Sorab Bedi insragram
Published on
Updated on
Summary

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच तिचा एका रहस्यमय व्यक्तीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या व्यक्तीचं नाव सोराब बेदी असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओनंतर दोघे डेटिंग करत असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. मात्र या नात्याबाबत मलायका किंवा सोराब यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

बॉलीवूड अभिनेत्री (Malaika Arora) नेहमीच तिच्या फिटनेस, फॅशन आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अलीकडेच ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. यावेळी कारण आहे तिचा एक व्हायरल व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये ती एका व्यक्तीसोबत दिसत असून त्या व्यक्तीचे नाव सोराब बेदी (Sorab Bedi) असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मलायका आणि सोराब डेटिंग करत असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.

malaika arora-orab bedi
Apurva Gore wedding album |'नांदा सौख्यभरे...' डोळ्यांत आनंदाश्रू अन्‌.. अपुर्वाचे लग्नातील खास फोटो, व्हिडिओ समोर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मलायका आणि सोराब एका ठिकाणी एकत्र दिसत आहेत. दोघेही एकमेकांसोबत टाईम स्पेंड करताना दिसताहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर डेटींगच्या चर्चांना उधाण आले आहे.

रिपोर्टनुसार, मलायका अरोरा सोराब बेदीसोबत पार्टी करताना दिसली. सोराबसोबत डान्स करताना आणि एन्जॉय करतानाचे मलायकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन समोर आले आहेत. सोराब जुहू येथील मलायकाच्या रेस्टॉरंटमध्ये एका पार्टीला उपस्थित होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय. आता तिच्या रिलेशनशिप स्टेटसची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

malaika arora-orab bedi
Hai Jawani Toh Ishq Hona Hai | वरुण-पूजा-मृणालचे त्रिकूट पाहण्यासाठी अजून प्रतीक्षा; चित्रपटाची रिलीज डेट बदलली

कोण आहे सोराब बेदी?

स्प्लिट्सव्हिला एक्स ६ मध्ये सोराब बेदी दिसला होता. तो ३१ वर्षांचा आहे. तो अभिनेता, मॉडल, रिॲलिटी टीव्ही स्टार आहे. रिॲलिटी शोमध्ये येण्यापूर्वी सोराबने 'चाँद जलने लगा' (रौनक सहगलची भूमिका), 'दिलवाली दूल्हा ले जाएगी' (कार्तिक कौशलची भूमिका) मध्ये दिसला होता.

सोराबने स्वतः मलायका आणि इतरांसोबतच्या पार्टीचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. फोटो शेअर करताना त्याने लिहिले, “.... @malaikaaroraofficial यांचे अभिनंदन.” पण, नंतर पोस्ट हटवण्यात आली. एका फोटोमध्ये, मलायका सोराबसोबत पोज देत आहे आणि दुसऱ्या एका छोट्या क्लिपमध्ये, ती सोराबसोबत डान्स करताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news