Hai Jawani Toh Ishq Hona Hai | वरुण-पूजा-मृणालचे त्रिकूट पाहण्यासाठी अजून प्रतीक्षा; चित्रपटाची रिलीज डेट बदलली

Hai Jawani Toh Ishq Hona Hai चित्रपटाची रिलीज डेट टळली; वरुण धवन, पूजा हेगडे, मृणाल ठाकूर त्रिकुटाला पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा
pooja higde-varun dhawan-mrunal thakur
Hai Jawani Toh Ishq Hona Hai new release date declaired instagram
Published on
Updated on
Summary

बॉलिवूड अभिनेता Varun Dhawan, अभिनेत्री Pooja Hegde आणि Mrunal Thakur यांच्या मुख्य भूमिका असलेल्या Hai Jawani Toh Ishq Hona Hai या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Varun Dhawan, Pooja Hegde, and Mrunal Thakur starrer Hai Jawani Toh Ishq Hona Hai new release date

बॉलिवूडमधील आगामी चित्रपटांपैकी एक असलेला Hai Jawani Toh Ishq Hona Hai सध्या चर्चेत आला आहे. या चित्रपटात वरुण धवन, मृणा ठाकुर, पूजा हेगडे ही तगडी स्टारकास्ट एकत्र दिसणार आहे. मात्र या चित्रपटाबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. वरुण धवनचा रोमँटिक आणि कॉमिक अंदाज, पूजा हेगडेची ग्लॅमरस उपस्थिती आणि मृणाल ठाकूरचा दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

pooja higde-varun dhawan-mrunal thakur
Bigg Boss Marathi - 6 | सोफ्यावर राखीने फेकलं पाणी, विशाल-राखीमध्ये बाचाबाची; बिग बॉसच्या घरात होणार पंगा?

मात्र आता चित्रपटाच्या रिलीजबाबत बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या फॅन्सना आता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

निर्मात्यांनी नव्या तारखेची केली घोषणा

वरुण धवन, पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटाची रिलीज तारीख १२ जून ठरवण्यात आली आहे. निर्माते रमेश तौराणी यांनी रिलीज तारखेत बदल केल्याची पुष्टी केली आहे. हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी असणार आहे. हा चित्रपट, जो आधी ५ जून २०२६ रोजी रिलीज होणार होता. आता फॅन्सना एका आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे.

pooja higde-varun dhawan-mrunal thakur
Apurva Gore wedding album |'नांदा सौख्यभरे...' डोळ्यांत आनंदाश्रू अन्‌.. अपुर्वाचे लग्नातील खास फोटो, व्हिडिओ समोर

दरम्यान, यश स्टारर 'टॉक्सिक' चित्रपट १९ मार्च ऐवजी ५ जून २०२६ ला रिलीज होणार आहे. त्यामुळ तत्काळ निर्मात्यांनी वरुण-मृणालच्याचित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलली.

आम्ही स्पष्ट करतो की, आमचा चित्रपट 'है जवानी तो इश्क होना है' आधी ५ जून रोजी रिलीज होणार होता. ही तारीख आम्ही काही महिन्यांपूर्वी जाहीर केली होती. पण, सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आमचा चित्रपट पुढे ढकलणे अधिक योग्य ठरेल असे आम्हाला वाटले.

-रमेश तौराणी, निर्माते

इतर कलाकार

चित्रपटात मौनी रॉय, मनीष पॉल, कुब्ब्रा सैत कलाकार दिसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news