नागराज मंजुळे-मकरंद मानेंचा ‘बापल्योक’ अॅमेझॅान प्राईमवर

baaplyok movie
baaplyok movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : बापल्योक' चित्रपटाने आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. नावाजलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 'संत तुकाराम' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट हा मानाचा बहुमान मिळवणारा तसेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण? (baaplyok movie) इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आंध्रप्रदेश तिरुपती, आपला बायोस्कोप, सिंधुरत्न पुरस्कार अशा पुरस्कार सोहळ्यांमध्ये गौरविलेला 'बापल्योक' चित्रपट आता 'अॅमेझॅान प्राईम व्हिडिओ' वर आला आहे. (baaplyok movie)

संबंधित बातम्या –

अभिनेते शशांक शेंडे, विठ्ठल काळे पायल जाधव, नीता शेंडे यांच्या अभिनयाने नटलेला 'बापल्योक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

'बापल्योक' या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. 'नाईंटीनाईन प्रोडक्शन्स'चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स'च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news