खुशबू-तितिक्षा तावडे यांनी जागवल्या प्रजासत्ताक दिनाच्या आठवणी

मराठी कलाकार
मराठी कलाकार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या सर्वांच्याच २६ जानेवारी या खास दिवसाच्या काही तरी आठवणी अशतील. यामध्ये मराठी कलाकाराही मागे नाहीत. प्रजासत्ताक दिनाच्या निम्मिताने कलाकारांनी त्यांच्या शाळेतील आठवणींचे पुस्तक उघडले.

संबंधित बातम्या –

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री 'तितिक्षा तावडे', "२६ जानेवारीला मला आठवतं की, आम्ही सर्व विद्यार्थी तयार होऊन शाळेत परेडमध्ये सहभागी व्हायचो. त्यानंतर खेळ आणि कलाकृती सादर व्हायच्या. मी लेझीम मध्ये भाग घ्यायची. मला लेझीम खेळायची प्रचंड आवड होती. माझी प्रत्यक्ष परेड पाहायची खूप इच्छा आहे. मला अभिमान आहे, या २६ जानेवारीला आपण आपल्या प्रजासत्ताक दिनाचं ७५ व वर्ष आपण साजरा करत आहोत.

'शिवा'च्या वेगळ्या लूकने चर्चेत असलेली 'पूर्वा कौशिक', "सगळ्यात पहिले सर्वांना ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या शुभेच्छा. माझी २६ जानेवारीची आठवण म्हणजे सकाळी ७ वाजता तयार होऊन शाळेत पोहचायचं परेड आणि लेझीममध्ये सामील व्हायचं. दरवर्षी शाळेत ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला मिळायचं. माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर देखील मी शाळेत त्यादिवशी जायचे.

'सारं काही तिच्यासाठी' मधील लाडकी उमा म्हणजेच 'खुशबू तावडे', "मी डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयाची विद्यार्थिनी आहे तिथे प्रत्येक सण आणि महत्वाचे दिवस खूप छानपणे साजरे केले जातात, त्यातला एक दिवस म्हणजे प्रजासकता दिवस. मी अगदी लहान होती तेव्हा माझ्या बाबांनी मला ध्वजारोहणाचं महत्व समजावलं होतं आणि ती गोष्ट माझ्या मनात नेहमीसाठी घर करून गेली. प्रजासत्ताक दिवसाची शाळेत एकदम जय्यत तयारी असायची मी स्काऊट गाईडचा भाग होते. परेडच उत्साही वातावरण आणि त्यानंतर खामध्ये मिळणारे सामोसे आणि चॉकलेट मला आताही लक्षात आहे. माझे सासरे नौदलचा भाग होते. ते आम्हाला एकदा नौसेनेची परेड बघायला घेऊन गेले होते. तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस आहे.

'पारू'ची सध्या सर्वत्र चर्चा होत आहेच. या मालिकेतील 'शरयू सोनावणे' म्हणते- "अभ्यासाला सुट्टी आणि फक्त हा दिवस साजरा करण्यासाठी शाळेत जायचं त्याचा आनंद वेगळाच असायचा. परेड व्हायची, प्रतिज्ञा म्हणायचो आणि मग सर्वांना छान-छान खाऊचे डब्बे मिळायचे. शाळेत माईकवर प्रतिज्ञा म्हणायची संधी नेहमी मलाच मिळायची. कारण मी वक्तृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवायची. मला ध्वजारोहण कसा करतात पाहायला खूप आवडायचं. मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. १० वी पर्यंत एमसीसी मध्ये होती तेव्हा नेहमी परेड मध्ये सहभागी व्हायची."

'सारं काही तिच्यासाठी' ची निशी म्हणजेच दक्षता जोईल ," २६ जानेवारीला माझ्या अभ्यासेतर उपक्रमाची सुरुवात झाली. मी छोट्या शिशूत होते तेव्हा माझ्या आई-बाबांनी एक पानाचे भाषण तयार केले होते आणि माझ्याकडून ते पाठ होत नसल्याने मी रडायला लागले. पण माझ्या आई-वडिलांनी खूप हुशारीने माझ्याकडून ते भाषण तयार करून घेतले आणि शाळेत २६ जानेवारीच्या दिवशी मी ते भाषण सर्वांसमोर सादर केले आणि त्यादिवशी शाळेतला प्रत्येक शिक्षक आणि कार्यक्रम पाहायला आलेले व्यक्ती माझं कौतुक करत होते. या निमित्ताने भारताच्या नागरिकांना एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही एकामेकांची मन जपा वाद विवाद टाळा."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news