

पुढारी ऑनलाईन डेस्क
चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रथमच ३ हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे जावून मराठी मजनू चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च नुकताच करण्यात आला. याप्रसंगी अभिनेता रोहन पाटील, नितीश चव्हाण (लागीर झालं टीव्ही सिरीयल फेम) अभिनेत्री श्वेतलाना अहिरे, दिग्दर्शक शिवाजी दोलताडे निर्माते गोवर्धन दोलताडे आदी उपस्थित होते.
दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले, चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रथमच ३ हजार फुटाच्या उंचीवर जाऊन चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे. याचं उंचीप्रमाणे मराठी चित्रपट जागतिक स्तरावर मला घेऊन जायचा आहे. प्रत्येकजण कॉलेजला गेल्यानंतर स्वतःला मजनू समजतो. जे लोक हा चित्रपट पाहतील. त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले की, प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा हा मजनू चित्रपट १० जून रोजी संपूर्ण प्रदर्शित होत आहे. संपूर्ण कुटुंबातील सदस्या हा चित्रपट आवडेल. "मजनू" चित्रपटात रसिकांना फाईट, एक्शन, रोमान्स तसेच लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहेत.