

Mahieka Sharma shares a hand-holding photo with Hardik Pandya
मुंबई - क्रिकेटविश्वाच्या स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या ने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिलीय. माहिका शर्माने त्याच्या सोबत एक रोमँटिक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे, ज्यात दोघे हातात हात घेऊन दिसत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झालीय. त्यांच्या फॅन्समध्ये मोठी चर्चा सुरु आहे.
रिपोर्टनुसार, हार्दिक आणि माहिका यांचे नाव काही दिवसांपासून जोडले जात होते. ते मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांच्या डेटिंगची चांगलीच चर्चा रंगली होती. आता इन्स्टा स्टोरीवरील फोटोवरून हे सर्वश्रूत झाले आहे की, हार्दिक-माहिका रिलेशनशीपमध्ये आहेत.
ही इन्स्टा स्टोरी माहिकाने शेअर केली आहे. काही फोटोंचा ग्रुप आणि कोलाज तिने शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा हात हार्दिकच्या हातात आहे. दुसऱ्या फोटोत काही फूड्सचे फोटोत आहेत. तिसऱ्या फोटोत ती समुद्रकिनारी पाठमोरी उभारल्याचे दिसते. आणखी काही फोटो व्हेकेशनचे आहेत. त्यामुळे दोघांनी प्रेमाची कबुली दिल्याचे सिद्ध झाले आहे.
याआधी व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये समुद्रकिनारी फोटो आहे, जिथे माहिका आणि हार्दिक एकमेकांच्या जवळ असून हार्दिकने माहिकाच्या खांद्यावर हात ठेवल्याचे दिसते. तसेच त्याने माहिकाला टॅग करून फोटो शेअर केला आहे, ज्याने या स्टोरीला एक स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
याचप्रकारे, दुसर्या स्टोरीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट झलक आहे, जिथे दोघे रोमँटिक पोजमध्ये दिसतात. या पोस्टवर हार्दिकने evil eye इमोजी वापरले.
माहिका शर्मा मॉडेल व अभिनेत्री आहे. ती विविध फॅशन शो, म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातींमध्ये दिसली आहे. तिचे वय २४ वर्ष आहे,
हार्दिकने यापूर्वी अभिनेत्री नताशा स्टेनकोविच सोबत विवाह केला होता आणि त्यांचा लग्नानंतर २०२४ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय झाला होता.