

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुप्रतीक्षित छोरी-२ या हॉरर थ्रीलरच्या ग्लोबल प्रीमिअर डेटची घोषणा केली गेलीय. विशाल फूरिया दिग्दर्शित 'छोरी 2’ हा टी-सीरिज, एबंडेंशिया एंटरटेनमेंट, साईक आणि तामारिस्क लेन प्रॉडक्शनचा सिनेमा आहे. पुन्हा एकदा साक्षीच्या व्यक्तिरेखेत नुशरत भरुचा झळकणार असून तिच्यासोबत मुख्य भूमिकेत सोहा अली खान दिसणार आहे. तसेच गश्मीर महाजनी, सौरभ गोयल, पल्लवी अजय, कुलदीप सरीन, आणि हार्दिका शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. छोरी-२ हा खास प्रीमिअर भारत तसेच जगभरातील सुमारे २४० देश-प्रदेशांतील प्रेक्षकांसाठी लॉन्च होईल. ११ एप्रिल २०२५ रोजी प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे.
“आम्ही “छोरी” या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना एका अशा कथेची ओळख करून दिली, जी खूप रंजक असली तरी भावनिकदृष्ट्या शक्तिशाली होती. या सिनेमाने भयपटांच्या शैलीशी परिपूर्ण जुळवून घेतले आणि लोककथांमध्ये भीतीचे मिश्रण ताजे आणि अस्सल वाटले”, असे प्राइम व्हिडिओ इंडियाचे कंटेंट लायसेंसिंगचे डायरेक्टर मनीष मेंघानी यांनी सांगितले.