Zubeen Garg death case | जुबिन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, शेवटच्या क्षणांचे व्हिडिओ रिकव्हर; IT एक्स्पर्टची मोठी कामगिरी!

जुबीन गर्ग यांचे अंतिम क्षणांचे डिलीट केलेले व्हिडिओ पोलिसांच्या IT Expert नी केले रिकव्हर
Zubeen Garg
new twist in Zubeen Garg death caseInstagram
Published on
Updated on

new twist in Zubeen Garg death case deleted videos recover

मुंबई- प्रसिद्ध दिवंगत गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूनंतर तपासातून नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. आता रिपोर्टनुसार, अमृतप्रभा महंत यांच्या मोबाईल मधून जुबीन गर्ग यांच्या अंतिम क्षणांना हटवण्यात आलेले व्हिडिओ पुन्हा रिकव्हर करण्यात यश आले आहे.

डिलीट झालेले व्हिडिओ पोलिसांच्या आयटी एक्सपर्टनी रिकव्हर केले असून ते व्हिडिओ अमृतप्रभा यांच्या दुसऱ्या फोनवरून मिळाले आहेत. दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, जुबीन गर्ग यांच्याशी संबंधित एका प्रकरणात सिंगापूरहून तीन एनआरआय आसाम पोहोचले आहेत. सीआयडीने त्यांना दुसरे समन पाठवले होते. जुबीन गर्ग यांच्या एका कार्यक्रमात तथाकथित गैरवर्तन केल्यासंबंधी त्यांची चौकशी होत आहे. पहिल्या समनला उत्तर न आल्याने सीआयडीने दुसरे समन जारी केले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसात सिंगापूरमध्ये रहणारे आणखी काही आसामी प्रवासी पोलिसांच्या समक्ष जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.

Zubeen Garg
Kantara Chapter 1 BO Collection | बॉक्स ऑफिसवर 'कांतारा'चा बोलबाला, तब्बल ६०० कोटी पार!

अटक झालेल्यांचे फुटेज चित्रपटांतून हटवणार

आसाममधील जनतेच्या आक्रोशांनंतर दिग्दर्शक राजेश भुयान यांनी स्पष्ट केले आहे की, जुबीन गर्ग यांच्या मृत्यूसंदर्भात अटक केलेल्या व्यक्तींचे फुटेज दिवंगत गायकाच्या शेवटचा चित्रपट 'रोई रोई बिनाले' मधून काढून टाकले जाईल.

जुबीनचा बँडमेट शेखर ज्योती गोस्वामी, मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि सह-गायक अमृत प्रभा महंत यांच्या अटकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गर्ग यांचा हा शेवटचा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील जुबीनचे "मुर मोन" हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता.

Zubeen Garg
Sajid Khan will comeback | MeToo च्या आरोपानंतर ७ वर्षांनी साजिद खानची वापसी; 'या' स्टारकिडला करणार लॉन्च?

'रोई रोई बिनाले' हे गाणे प्रदर्शित झाल्या नंतर गाण्यात शेखर ज्योती गोस्वामी यांच्यावरील सीनवरून लोकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे दिग्दर्शकाने स्पष्ट केले की, ''आम्ही ते फुटेज काढून टाकू. आम्ही असे काहीही करणार नाही ज्यामुळे लोक नाराज होतील. जुबीन नेहमीच लोकांसोबत होता.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news